Thalapathy Vijay Retirement: धक्कादायक! थलापती विजयचा चित्रपटसृष्टीला कायमचा ‘रामराम’; 33 वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीनंतर आता निवडले ‘हे’ क्षेत्र

तब्बल 33 वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर विजयने सिनेसृष्टीला निरोप देण्याचा निर्णय घेतला असून, या बातमीने जगभरातील त्याचे करोडो चाहते भावूक झाले आहेत.

Thalapathy Vijay Retirement: धक्कादायक! थलापती विजयचा चित्रपटसृष्टीला कायमचा ‘रामराम’; 33 वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीनंतर आता निवडले ‘हे’ क्षेत्र

Thalapathy Vijay Retirement: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थलापती विजय याने अभिनयातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल 33 वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर विजयने सिनेसृष्टीला निरोप देण्याचा निर्णय घेतला असून, या बातमीने जगभरातील त्याचे करोडो चाहते भावूक झाले आहेत. 27 डिसेंबर 2025 रोजी मलेशियामध्ये पार पडलेल्या आपल्या शेवटच्या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच सोहळ्यात त्याने हा मोठा निर्णय जाहीर केला.

‘जन नायकन’ असणार शेवटचा चित्रपट

विजयचा आगामी चित्रपट ‘जन नायकन’ (Jana Nayakan) हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट ठरेल. 9 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक एच. विनोद यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात विजयसोबत बॉबी देओल, पूजा हेगडे आणि प्रियामणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याने या चित्रपटाला संगीत दिले आहे.

हेही वाचा – Dhurandhar box office: 23 दिवसांनंतरही ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर कहर; सिनेमाने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

निवृत्तीची घोषणा करताना 51 वर्षीय विजय अत्यंत भावूक झाला होता. तो म्हणाला, “मी चित्रपटसृष्टीत एक छोटासा वाळूचा किल्ला बांधण्याच्या आशेने आलो होतो, पण माझ्या चाहत्यांनी मला राजवाडा दिला. गेली 33 वर्षे तुम्ही माझ्यावर जे प्रेम केले आणि माझ्या कठीण काळात जी सोबत दिली, त्याचे आभार मानण्यासाठी आता मला तुमच्यासाठी उभे राहायचे आहे. हा विजय तुमची कृतज्ञता परत करण्यासाठी राजकारणाच्या मैदानात उतरत आहे.”

हेही वाचा – Stampede Case: ‘पुष्पा 2’ चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत मोठी अपडेट; अल्लू अर्जुनसह 23 जणांविरुद्ध 100 पानांचे आरोपपत्र दाखल

राजकीय प्रवासाला नवी दिशा

थलापती विजयने गेल्या वर्षी ‘तमिलगा वेत्री कझगम’ (TVK) या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आता त्याने आपला पूर्ण वेळ जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेसृष्टीतील निवृत्तीनंतर तो आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number