IND vs PAK: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! अंडर-19 आशिया चषकात भारताचा पाकिस्तानकडून 191 धावांनी पराभव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्विवाद वर्चस्व गाजवले. सलामीवीर समीर मिन्हासने केवळ 113 चेंडूत 17 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 172 धावांची स्फोटक खेळी खेळली.

IND vs PAK: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! अंडर-19 आशिया चषकात भारताचा पाकिस्तानकडून 191 धावांनी पराभव

IND vs PAK U19 Asia Cup Final 2025: अंडर-19 आशिया चषकाच्या जेतेपदावर नाव कोरण्याच्या निश्चयाने मैदानात उतरलेल्या भारतीय युवा संघाला अंतिम सामन्यात मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानने भारताचा 191 धावांच्या अवाढव्य फरकाने पराभव करत आशिया चषकावर आपले नाव कोरले. समीर मिन्हासच्या तुफानी शतकाच्या जोरावर पाकिस्तानने उभारलेल्या 347 धावांच्या डोंगरासमोर भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली.

पाकिस्तानी फलंदाजीचा झंझावात; समीर मिन्हासची 172 धावांची खेळी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्विवाद वर्चस्व गाजवले. सलामीवीर समीर मिन्हासने केवळ 113 चेंडूत 17 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 172 धावांची स्फोटक खेळी खेळली. समीरने आपले शतक अवघ्या 71 चेंडूत पूर्ण केले होते. त्याच्या या खेळीमुळे पाकिस्तानने 50 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 347 धावांचा डोंगर उभा केला.

हेही वाचा – Shubman Gill:T-20 वर्ल्डकप संघातून शुभमन गिलला वगळलं; अजित आगरकर यांचा खुलासा 'सध्या त्याला धावा काढण्यात संघर्ष…'

भारताची फलंदाजी पत्त्यांसारखी कोसळली

दरम्यान, 348 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 156 धावांत तंबूत परतला. कर्णधार आयुष म्हात्रे अवघ्या 2 धावांवर बाद झाला, तर स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी 10 चेंडूत 26 धावा करून माघारी परतला. भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर 10 व्या क्रमांकावर आलेल्या दीपेश देवेंद्रनने सर्वाधिक 36 धावा (16 चेंडू) केल्या, परंतु तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता.  

हेही वाचा – ICC T20 World Cup 2026: शुभमन गिल बाहेर, इशान किशनची धडाकेबाज एन्ट्री! टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्कॉड जाहीर

पाकिस्तानची अचूक गोलंदाजी

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला. अली रझा याने 42 धावांत 4 बळी घेत भारताचे कंबरडे मोडले. त्याला मोहम्मद सय्यम, अब्दुल सुभान आणि हुजैफा एहसान यांनी प्रत्येकी 2 बळी घेत मोलाची साथ दिली. या पराभवामुळे भारताचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले असून, पाकिस्तानने सर्वच विभागांत सरस कामगिरी करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number