T20 World Cup 2026: टीम इंडिया चॅम्पियन! कोण ठरलं प्लेअर ऑफ द मॅच? कोणाला कोणता पुरस्कार मिळाला? वाचा संपूर्ण यादी

या विजयात प्रत्येक सामन्यात भारताला नवा हिरो मिळाला, परंतु अंतिम टप्प्यात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांची कामगिरी निर्णायक ठरली.

T20 World Cup 2026: टीम इंडिया चॅम्पियन! कोण ठरलं प्लेअर ऑफ द मॅच? कोणाला कोणता पुरस्कार मिळाला? वाचा संपूर्ण यादी

T20 World Cup 2026:  भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर मात करत पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. संपूर्ण स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा अपवाद वगळता भारताने एकही सामना गमावला नाही. या विजयात प्रत्येक सामन्यात भारताला नवा हिरो मिळाला, परंतु अंतिम टप्प्यात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांची कामगिरी निर्णायक ठरली. संजू सॅमसनने या स्पर्धेत एकूण 321 धावा फटकावल्या. विशेषतः शेवटच्या 3 सामन्यांत त्याने सलग 80 पेक्षा जास्त धावांच्या खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सुरुवातीला प्लेइंग इलेव्हनबाहेर असलेल्या संजूला त्याच्या या झंझावाती कामगिरीसाठी 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' (मालिकावीर) पुरस्काराने गौरवण्यात आले.

अंतिम सामन्यात बुमराहची जादू
न्यूझीलंडविरुद्धच्या हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह भारताचा तारणहार ठरला. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर केवळ 15 धावा देऊन 4 बळी टिपले. 5 बळी घेण्याची संधी थोडक्यात हुकली असली, तरी त्याच्या या स्पेलमुळे न्यूझीलंडचे कंबरडे मोडले आणि त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' (सामनावीर) घोषित करण्यात आले. बुमराहने संपूर्ण स्पर्धेत एकूण 14 बळी घेतले आहेत.

सर्वाधिक धावा आणि बळींची आकडेवारी
या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा साहिबजादा फरहान अव्वल स्थानी राहिला. त्याने 383 धावा केल्या असून एकाच टी२० विश्वचषकात 2 शतके ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक बळी घेण्याच्या शर्यतीत भारताचा जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती हे 14 बळींसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर राहिले.

संजू सॅमसनचे सर्वाधिक षटकार
फलंदाजीमध्ये संजू सॅमसनने केवळ धावाच केल्या नाहीत, तर त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनही केले. संजूने या स्पर्धेत सर्वाधिक 24 षटकार ठोकले, तर न्यूझीलंडचा फिन ॲलन 20 षटकारांसह दुसऱ्या स्थानी राहिला. क्षेत्ररक्षणात ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 11 झेल घेत आपली छाप पाडली. सर्वाधिक 37 चौकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानच्या नावावर नोंदवला गेला आहे.

हेही वाचा – Suryakumar Yadav On Retirement : "निवृत्तीचा विचार…" निवृत्तीबाबत सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य; गंभीरच्या उपस्थितीत म्हणाला,

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी:

विजेता संघ: भारत
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: संजू सॅमसन (321 धावा, 24 षटकार)
प्लेअर ऑफ द मॅच (फायनल): जसप्रीत बुमराह (4 बळी)
सर्वाधिक धावा: साहिबजादा फरहान (383 धावा)
सर्वाधिक बळी: जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती (प्रत्येकी 14 बळी)
 सर्वाधिक झेल: ग्लेन फिलिप्स (11 झेल)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number