Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला ‘धुरंधर’ची भुरळ; अक्षय खन्नाच्या गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हायरल व्हिडीओ

'मिस्टर 360' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्याला सध्या बॉलीवूडच्या 'धुरंधर' या चित्रपटाची भुरळ पडल्याचे दिसत आहे.

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला ‘धुरंधर’ची भुरळ; अक्षय खन्नाच्या गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हायरल व्हिडीओ

Suryakumar Yadav: आयपीएल 2026 च्या रणधुमाळीत मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या केवळ आपल्या बॅटिंगमुळेच नाही, तर आपल्या जबरदस्त ‘डान्स स्टेप्स’मुळेही चर्चेत आला आहे. ‘मिस्टर 360’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्याला सध्या बॉलीवूडच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाची भुरळ पडल्याचे दिसत असून, त्याने मैदानाबाहेर अक्षय खन्नाच्या स्टाईलची हुबेहूब नक्कल करून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सूर्याचा ‘धुरंधर’ अवतार; अक्षय खन्नाच्या डान्सची सोशल मीडियावर हवा
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. अशातच मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर सूर्याचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्या ‘धुरंधर’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘फिपाराची’ (Fipparachi) गाण्यावर अक्षय खन्नाच्या सिग्नेचर स्टेप्स करताना दिसत आहे. सूर्याचा हा अंदाज पाहून त्याचे सहकारी खेळाडू आणि कर्मचारी थक्क झाले असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वीही सूर्याने या चित्रपटातील ‘पेडी’ या पात्राची शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न केला होता.

जसप्रीत बुमराहसोबतची मिश्किल जुगलबंदी: “घर की याद नहीं आई, जस्सी?”
सूर्याचे ‘धुरंधर’ प्रेम केवळ डान्सपुरते मर्यादित नाही. एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा नीता अंबानी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक करत होत्या, तेव्हा सूर्याने मध्येच मिश्किलपणे बुमराहला विचारले, “घर की याद नहीं आई, जस्सी?”. हा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ चित्रपटातील रणवीर सिंगला उद्देशून म्हटलेला अत्यंत लोकप्रिय संवाद आहे. विशेष म्हणजे, बुमराहची पत्नी संजना गणेशन हिनेही नुकताच हाच संवाद वापरल्याने मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हास्याची कारंजी उडाली. सूर्याची ही खेळकर वृत्ती संघातील चैतन्य वाढवण्यास मदत करत आहे.

हेही वाचा – PM Modi Praises Sanju Samson: ‘संजू सॅमसन खरा योद्धा…’; पंतप्रधान मोदींकडून खेळाडूचं तोंड भरून कौतुक

बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’चा ऐतिहासिक झंझावात 
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ मालिकेतील चित्रपटांनी भारतीय सिनेसृष्टीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाने जगभरात 1,300 कोटींची कमाई केली होती. तर 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ ने अवघ्या काही दिवसांतच 1,500 कोटींचा आकडा ओलांडून इतिहास रचला आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाची भुरळ आता क्रिकेटर्सवरही चढली असल्याचे सूर्यकुमार यादवच्या या कृत्यावरून स्पष्ट होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number