Dada Poster : ‘दादा’चा फर्स्ट लुक रिलीज! राजकुमार रावला सौरव गांगुलीच्या अवतारात पाहून चाहते थक्क; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

एक प्रतिभावान क्रिकेटपटू ते भारतीय क्रिकेटला नवा चेहरा देणारा एक सर्वात प्रभावशाली कर्णधार असा सौरव गांगुली यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

Dada Poster : ‘दादा’चा फर्स्ट लुक रिलीज! राजकुमार रावला सौरव गांगुलीच्या अवतारात पाहून चाहते थक्क; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Sourav Ganguly Biopic ‘Dada’ Poster Release : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी आणि आक्रमक माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी त्याच्या आगामी बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत चमकणार आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच या चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आल्याने सौरव गांगुली कमालीचा भावुक आणि आनंदी झाला आहे. राजकुमार रावला स्वतःच्या लूकमध्ये पाहून गांगुलीने या पोस्टरला आपल्या आयुष्यातील ‘सर्वोत्तम भेट’ म्हटले आहे. तसेच राजकुमारने या भूमिकेसाठी घेतलेल्या अपार मेहनतीचे आणि समर्पणाचे त्याने भरभरून कौतुक केले.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत
या अधिकृत पोस्टरमध्ये अभिनेता राजकुमार राव प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानाच्या बाल्कनीमध्ये उभा असलेला दिसत असून त्याच्या हातात टीम इंडियाची जर्सी हवेत उंचावलेली दिसत आहे. हा लूक 2002 मधील नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून देतो, जेव्हा भारताने इंग्लंडचा पराभव केल्यानंतर गांगुलीने बाल्कनीमध्ये आपली जर्सी काढून हवेत फडकवली होती. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा अत्यंत आयकॉनिक आणि आक्रमक क्षण मानला जातो. या चित्रपटाची रंजक टॅगलाइन ‘त्यांनी फक्त खेळ खेळला नाही, तर खेळ बदलून टाकला’ अशी असून हा चित्रपट 14 मे 2027 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी करत असून लव रंजन यांनी याची निर्मिती केली आहे.

हेही वाचा – Miracle of Mind : ‘बियॉन्ड द स्पॉटलाइट’ अभिनेता सुयश टिळक यांनी ईशा फाउंडेशनच्या सहकार्याने सादर केला अभिनव कार्यक्रम

पोस्टरच्या खराब एडिटिंगमुळे नेटकरी नाराज
एकीकडे सौरव गांगुलीच्या चाहत्यांमध्ये या बायोपिकबद्दल प्रचंड उत्सुकता असताना, दुसरीकडे मात्र या पोस्टरच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोस्टरचे एडिटिंग अतिशय सुमार दर्जाचे झाल्याचा आरोप करत अनेक युजर्सनी चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘यापेक्षा एखादा सामान्य फॅन खूप चांगलं पोस्टर बनवू शकला असता.’ तर दुसऱ्या एका युझरने ‘यापेक्षा चॅटजीपीटीने अधिक चांगलं काम केलं असतं’ असा सणसणीत टोला लगावला. ‘आम्ही शाळेत यापेक्षा उत्तम प्रोजेक्ट बनवायचो, हे खरंच अधिकृत पोस्टर आहे का?’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी या पोस्टरवर जोरदार टीका केली आहे.

थिएटरमध्ये ‘दादा’गिरी पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी सज्ज
एक प्रतिभावान क्रिकेटपटू ते भारतीय क्रिकेटला नवा चेहरा देणारा एक सर्वात प्रभावशाली कर्णधार असा सौरव गांगुली यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. जरी पोस्टरवरून सध्या उलटसुलट चर्चा आणि ट्रोलिंग सुरू असले, तरीही क्रिकेटप्रेमी आणि चित्रपट रसिकांमध्ये विक्रमादित्य मोटवाने यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. 14 मे 2027 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती ‘दादागिरी’ करतो आणि राजकुमार राव सौरव गांगुलीच्या भूमिकेला कितपत न्याय देतो, हे पाहणे रंजक ठरेल.

हेही वाचा – Sarvesh Kushare : निफाडच्या सर्वेश कुशारेंची ऐतिहासिक झेप; 2.31 मीटर उंच उडीत भारताचा नवा राष्ट्रीय विक्रम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number