FIFA World Cup 2026: 92 वर्षांत जे कधी घडलं नाही ते घडलं! जर्मनीचा थरारक पराभव; पेनल्टी शूटआउटमध्ये पॅराग्वेने रचला इतिहास

फुटबॉल जगतातील महासत्ता आणि तब्बल 4 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या जर्मनीला 'राऊंड ऑफ 32' मध्ये पॅराग्वेने पराभवाचा चटका दिला.

FIFA World Cup 2026: 92 वर्षांत जे कधी घडलं नाही ते घडलं! जर्मनीचा थरारक पराभव; पेनल्टी शूटआउटमध्ये पॅराग्वेने रचला इतिहास

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक स्पर्धेत फुटबॉल चाहत्यांना एक प्रचंड मोठा धक्का बसला आहे. फुटबॉल जगतातील महासत्ता आणि तब्बल 4 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या जर्मनीला 'राऊंड ऑफ 32' मध्ये पॅराग्वेने पराभवाचा चटका दिला. निर्धारित 90 मिनिटे आणि त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. अखेर सामन्याचा निकाल लावण्यासाठी झालेल्या अटीतटीच्या पेनल्टी शूटआउटमध्ये पॅराग्वेने जर्मनीचा 4-3 असा पराभव करत त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. 1954, 1974, 1990 आणि 2014 चा विश्वचषक जिंकणाऱ्या जर्मनीसाठी हा पराभव अत्यंत वेदनादायी ठरला आहे.

जर्मनीच्या 92 वर्षांच्या फुटबॉल इतिहासात पहिल्यांदाच घडली 'ही' नकोशी घटना
या पराभवामुळे जर्मनीच्या नावावर तब्बल 92 वर्षांच्या विश्वचषक इतिहासात एक अत्यंत लाजीरवाण्या आणि नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. जर्मनीने 1934 च्या विश्वचषकापासून (1930 आणि 1950 चा अपवाद वगळता) आजवरच्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. परंतु, विश्वचषकाच्या इतिहासात पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत होण्याची जर्मनीची ही पहिलीच वेळ आहे. 1978 मध्ये पेनल्टी शूटआउटचा नियम आल्यापासून जर्मनीने खेळलेल्या पाच शूटआउटपैकी 4 सामन्यांत विजय मिळवला होता. आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा इतिहास पाहिल्यास, 1976 च्या युरो कपमध्ये चेकोस्लोव्हाकियाकडून झालेल्या पराभवानंतर, एखाद्या मोठ्या स्पर्धेत पेनल्टीमध्ये पराभूत होण्याची जर्मनीची ही केवळ दुसरीच वेळ आहे.

पॅराग्वेविरुद्ध जर्मनीची विजयी मालिका खंडित; पेनल्टी शूटआउटचा असा राहिला आलेख
यापूर्वी जर्मनीने 1982 मध्ये फ्रान्सला (5-4), 1986 मध्ये मेक्सिकोला (4-1), 1990 मध्ये इंग्लंडला (4-3) आणि 2006 मध्ये अर्जेंटिनाला (4-2) पेनल्टी शूटआउटमध्ये धूळ चारली होती. मात्र, पॅराग्वेविरुद्ध त्यांची ही विजयी घोडदौड थांबली. या सामन्यात जर्मनीकडून जोशुआ किमिच, जमाल मुसियाला आणि नादिम अमीरी यांनी गोल केले, तर काई हाव्हर्ट्झ आणि जोनाथन ता यांचे गोल हुकले. दुसरीकडे, पॅराग्वेसाठी मॉरिसिओ, गुस्तावो गोमेझ, मटियास गलार्झा आणि जोस कॅनाले यांनी अचूक गोल डागले, तर अँटोनियो सॅनब्रिया आणि फॅबियन बाल्बुएना यांना गोल करता आला नाही.

'VAR' चा फटका आणि गोलकीपर ऑर्लँडो गिलची उत्कृष्ट भिंत
जर्मनीच्या पराभवाला आणि पॅराग्वेच्या विजयाला कारणीभूत ठरला तो म्हणजे त्यांचा गोलकीपर ऑरलैंडो गिल. त्याने 120 मिनिटांच्या मैदानी खेळात आणि त्यानंतर शूटआउटमध्येही अप्रतिम बचाव करत जर्मनीचे मनसुबे उधळून लावले. या सामन्यात जर्मनीचे दुर्दैवही आडवे आले; अतिरिक्त वेळेत जर्मनीने केलेला एक गोल नाकारण्यात आला. जर तो गोल ग्राह्य धरला गेला असता, तर जर्मनीने हा सामना 2-1 ने जिंकला असता.

हेही वाचा – IND vs ENG : संजू सॅमसनचा पत्ता कट? इंग्लंडविरुद्ध 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी करणार पदार्पण; अशी असेल भारताची प्लेईंग 11

सर्वाधिक 8 वेळा फायनल खेळणाऱ्या जर्मनीची विश्वचषकातील घसरण
2014 मध्ये विश्वविजेते बनल्यानंतर जर्मनीला नॉकआउट (बाद फेरी) सामन्यात पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. 2018 आणि 2022 च्या विश्वचषकात ते गट फेरीतूनच (Group Stage) बाहेर पडले होते, अशी नामुष्की यापूर्वी केवळ 1938 मध्ये ओढवली होती. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 8 वेळा अंतिम सामना खेळण्याचा विक्रम आजही जर्मनीच्या नावावर आहे. या 8 पैकी 6 फायनल आणि 4 पैकी 3 विजेतेपदे त्यांनी 'पश्चिम जर्मनी' म्हणून मिळवली होती. 2014 मधील जेतेपद हेच त्यांचे एकसंध राष्ट्र म्हणून जिंकलेले एकमेव विश्वविजेतेपद आहे. मात्र, यंदाच्या पराभवामुळे जर्मनीच्या फुटबॉलसमोरील अडचणी पुन्हा एकदाधोरेखित झाल्या आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number