IPL 2026 Final Live Streaming: शुभमन गिल विरुद्ध रजत पाटीदार! IPL ट्रॉफीवर कुणाचे नाव कोरणार? जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ‘लाईव्ह सामना’

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात विजेतेपदासाठी महामुकाबला रंगणार आहे.

IPL 2026 Final Live Streaming: शुभमन गिल विरुद्ध रजत पाटीदार! IPL ट्रॉफीवर कुणाचे नाव कोरणार? जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ‘लाईव्ह सामना’

RCB vs GT IPL 2026 Final:  इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून रविवारी क्रिकेटप्रेमींना हंगामातील सर्वात मोठ्या सामन्याची मेजवानी मिळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात विजेतेपदासाठी महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यानंतर IPL 2026 च्या विजेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

सलग दुसऱ्या विजेतेपदाच्या इराद्याने RCB मैदानात

गेल्या हंगामात प्रथमच IPL ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या RCB संघासमोर यंदा विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने लीग टप्प्यात दमदार कामगिरी करत 14 पैकी 9 सामने जिंकले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर क्वालिफायर-1 मध्ये गुजरात टायटन्सचा तब्बल 92 धावांनी पराभव करत RCB ने थेट अंतिम फेरीत धडक मारली.

गुजरात टायटन्सचे घरच्या मैदानावर पुनरागमन

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने यंदाच्या हंगामात शानदार पुनरागमन केले आहे. लीग फेरीत 18 गुणांसह अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवणाऱ्या गुजरातने क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता घरच्या मैदानावर 2022 च्या विजेतेपदाची पुनरावृत्ती करण्यासाठी गुजरातचा संघ सज्ज झाला आहे.

अंतिम सामना कधी आणि कुठे?

IPL 2026 चा अंतिम सामना रविवारी, 31 मे 2026 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर त्यापूर्वी 7 वाजता नाणेफेक पार पडेल.

सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

क्रिकेट चाहत्यांना हा महामुकाबला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येणार आहे. तसेच JioHotstar ॲप आणि संकेतस्थळावर सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. विविध भारतीय भाषांमध्ये समालोचनासह सामना पाहण्याची सुविधाही प्रेक्षकांना मिळणार आहे.

गुजरात टायटन्सची ताकद

गुजरात टायटन्सकडे शुभमन गिल, जोस बटलर, साई सुदर्शन, रशीद खान, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संतुलित संघरचना असल्यामुळे गुजरातला घरच्या मैदानाचा फायदा मिळू शकतो.

हेही वाचा – RCB vs GT IPL Final 2026: आरसीबी विरुद्ध गुजरात हाय-व्होल्टेज सामना! विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव; उपविजेत्याला किती रुपये मिळणार? जाणून घ्या A टू Z माहिती

RCB संघातील खेळाडू

दुसरीकडे RCB कडे विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांसारखे मॅचविनर खेळाडू आहेत. विशेषतः विराट कोहलीच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष लागले असून अंतिम सामन्यात तो संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी

गतविजेता RCB आणि घरच्या मैदानावर खेळणारा गुजरात टायटन्स यांच्यातील हा अंतिम सामना अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. एका बाजूला सलग दुसऱ्या विजेतेपदासाठी RCB सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्स पुन्हा एकदा ट्रॉफी उंचावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे IPL 2026 च्या अंतिम सामन्यात क्रिकेटप्रेमींना थरार, उत्साह आणि रोमांच यांचा दुहेरी आनंद मिळणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number