Shubman Gill With Sachin Tendulkar: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल सध्या क्रिकेटच्या मैदानाबाहेर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेपूर्वी शुभमनने लंडनमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध विम्बल्डन टेनिस स्पर्धेला हजेरी लावली. विशेष म्हणजे, या स्पर्धेदरम्यान तो क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासोबत बसलेला दिसला. तिघांचे हे फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी शुभमन आणि सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर यांच्यातील कथित प्रेमसंबंधांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आणले आहे. सोशल मीडियावर या एकाच फोटोने सध्या मोठा धुमाकूळ घातला आहे.
लंडनमधील ‘तो’ स्टायलिश अंदाज ठरला लक्षवेधी
विम्बल्डनच्या या सामन्यासाठी शुभमन गिल अत्यंत डॅशिंग आणि स्टायलिश लूकमध्ये पोहोचला होता. त्याने फिकट तपकिरी रंगाचा ब्लेझर, निळा शर्ट, टाय आणि काळा चष्मा परिधान केला होता. तर सचिन तेंडुलकर नेव्ही ब्लू सूटमध्ये आणि अंजली तेंडुलकर ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये उपस्थित होत्या. या तिघांना एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहून चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये “सासरे आणि जावयाची जोडी मस्त आहे” आणि “आता लग्न पक्कं समजायचं का?” अशा भन्नाट आणि मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, शुभमन किंवा सारा या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल आजपर्यंत कधीही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
Shubman Gill with Sachin Tendulkar at the Wimbledon. pic.twitter.com/xrfZyDHjTF — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 10, 2026
मैदानापासून सोशल मीडियापर्यंत नेहमीच चर्चा
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचे नाव सोशल मीडियावर सातत्याने एकत्र जोडले जात आहे. अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगी दोघे एकाच ठिकाणी किंवा एकाच रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या फोटोंमध्ये स्पॉट झाल्यामुळे चाहत्यांकडून असे तर्कवितर्क लढवले जातात. अगदी क्रिकेटच्या मैदानावर लाइव्ह मॅच दरम्यानही अनेकदा प्रेक्षक शुभमनला पाहताच “सारा… सारा…” अशा घोषणा देत त्याचे लक्ष वेधून घेताना दिसतात. मात्र, दोघांनीही या चर्चांवर कधी जाहीर शिक्कामोर्तब केलेले नाही आणि कधी त्याचे खंडनही केलेले नाही.
हेही वाचा – Smriti Mandhana: स्मृती मानधनाने इतिहास घडवला! लॉर्ड्सवर पहिल्याच महिला कसोटीत केला मोठा विक्रम
14 जुलैपासून भारत-इंग्लंड वनडे थरार; वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन
या सर्व चर्चांमधेच शुभमन गिल लवकरच मैदानावर भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका येत्या 14 जुलैपासून सुरू होत आहे. टी-20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाला या एकदिवसीय मालिकेत जोरदार पुनरागमन करण्याची मोठी संधी आहे. आगामी 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ही मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.