Shreyas Iyer Injury: श्रेयस अय्यरला बरगड्यांना गंभीर दुखापत; सिडनी रुग्णालयात ICU मध्ये दाखल

झेल घेताना झालेल्या अपघातात अय्यरच्या बरगड्यांना जोरदार दुखापत झाली असून, त्याला तत्काळ सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.<br/>

Shreyas Iyer Injury: श्रेयस अय्यरला बरगड्यांना गंभीर दुखापत; सिडनी रुग्णालयात ICU मध्ये दाखल

Shreyas Iyer Injury: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला आहे. झेल घेताना झालेल्या अपघातात अय्यरच्या बरगड्यांना जोरदार दुखापत झाली असून, त्याला तत्काळ सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.

या घटनेबाबत माहिती देताना संघाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, अय्यरला अंतर्गत रक्तस्त्राव (Internal Bleeding) झाल्याचे आढळून आल्यानंतर तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, पुढील दोन ते सात दिवस त्याला निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. रक्तस्त्रावातून संसर्ग होऊ नये यासाठी सतत वैद्यकीय लक्ष दिले जात आहे.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचा धमाकेदार कमबॅक, पण चर्चा मात्र पत्नी रितिकाच्या सोशल मीडिया पोस्टची

सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीचा चेंडू हवेत गेल्यानंतर अय्यर बॅकवर्ड पॉइंटवरून मागे धावत झेल घेण्यासाठी गेला. त्याने एक अप्रतिम डायव्हिंग कॅच घेतला, मात्र त्याच क्षणी त्यांच्या बरगड्यांवर जोरदार धक्का बसला. वेदनेने तो जमिनीवर पडला. त्यानंतर तात्काळ फिजिओ मैदानावर दाखल झाले.

हेही वाचा – Rohini Kalam Death: आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहिणी कलम घरात मृत अवस्थेत; चौकशी सुरू, क्रीडा क्षेत्रात शोककळा

अय्यरला तत्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले. ड्रेसिंग रूममध्ये नेल्यानंतर त्यांची नाडी, रक्तदाब आणि तापमानात अनियमितता दिसून आली तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याचे टीम वैद्यकांनी नोंदवले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले.

बीसीसीआय सूत्रांची प्रतिक्रिया

बीसीसीआयशी संबंधित सूत्राने माहिती दिली की, श्रेयसची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण ही घटना अत्यंत धोकादायक ठरू शकली असती. डॉक्टरांच्या टीमने आणि फिजिओंनी कोणताही धोका न घेता त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. तो मानसिकदृष्ट्या मजबूत खेळाडू आहे आणि लवकरच मैदानात परत येईल, अशी आशा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. श्रेयस अय्यर हा भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज असून, सध्या त्याची प्रकृती पुन्हा पूर्ववत होण्याबाबत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. तथापी, याबाबत बीसीसीआय लवकरच अधिकृत निवेदन जारी करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number