T20I World Record: क्रिकेट विश्वात खळबळ! 15 वर्षीय खेळाडूचा टी-20 मध्ये ऐतिहासिक पराक्रम; पदार्पणाच्या सामन्यातच मोडले 2 विश्वविक्रम

तिने केवळ 65 चेंडूंमध्ये 111 धावांची झंझावाती खेळी केली, ज्यामध्ये 17 चौकारांचा समावेश होता.

T20I World Record: क्रिकेट विश्वात खळबळ! 15 वर्षीय खेळाडूचा टी-20 मध्ये ऐतिहासिक पराक्रम; पदार्पणाच्या सामन्यातच मोडले 2 विश्वविक्रम

T20I World Record: आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात आपली छाप पाडण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहत असतो, मात्र रवांडाच्या अवघ्या 15 वर्षीय फॅनी उटागुशिमा-निंदे हिने हे स्वप्न वास्तवात उतरवत इतिहास रचला आहे. ‘नायजेरिया इन्व्हिटेशनल महिला T20I’ स्पर्धेत घानाविरुद्ध खेळताना फॅनीने बॅटने अशी काही फटकेबाजी केली की, तिने एकाच वेळी दोन मोठे विश्वविक्रम आपल्या नावावर केले. या कामगिरीमुळे क्रिकेट जगतात सध्या तिचीच चर्चा रंगली आहे.

पुरुष आणि महिला क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकी खेळी
फॅनी उटागुशिमा-निंदे हिने वयाच्या अवघ्या 15 वर्षे आणि 223 दिवसांच्या असताना हे अचाट यश संपादन केले. तिने केवळ 65 चेंडूंमध्ये 111 धावांची झंझावाती खेळी केली, ज्यामध्ये 17 चौकारांचा समावेश होता. या खेळीसह तिने फ्रान्सच्या गुस्ताव मॅककिओन याचा विक्रम मोडीत काढला. गुस्तावने 2022 मध्ये वयाच्या 18 वर्षे आणि 280 दिवसांच्या असताना शतक झळकावले होते. आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये (पुरुष आणि महिला दोन्ही गटात) शतक झळकावणारी फॅनी ही जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे.

हेही वाचा – Harshit Rana Replacement: KKR ला मोठा धक्का, हर्षित राणा IPL 2026 मधून बाहेर; बदली खेळाडूबाबत प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा खुलासा

पदार्पणात शतक झळकावणारी पहिलीच महिला खेळाडू
फॅनीने केवळ वयाचाच विक्रम मोडला नाही, तर महिला क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडू कॅरेन रोल्टन यांच्या नावावर होता. रोल्टन यांनी 2005 मध्ये इंग्लंडविरुद्ध आपल्या पदार्पणात नाबाद 96 धावा केल्या होत्या. फॅनीने 111 धावा करत रोल्टन यांचा 21 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आणि पदार्पणाच्याच सामन्यात शतक झळकावणारी ती जगातील पहिली महिला खेळाडू बनली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number