Actress Praveena Deshpande passes Away : मनोरंजन विश्वावर शोककळा! सलमान खानबरोबर काम करणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीची अकाली एक्झिट

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रविणा देशपांडे यांचे आज वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Actress Praveena Deshpande passes Away : मनोरंजन विश्वावर शोककळा! सलमान खानबरोबर काम करणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीची अकाली एक्झिट

Actress praveena Deshpande passed away: मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रविणा देशपांडे यांचे आज 17 फेब्रुवारी 2026 रोजी निधन झाले. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपट आणि मालिका विश्वात शोककळा पसरली आहे. प्रविणा यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या कुटुंबीयांनी ही दुःखद वार्ता चाहत्यांशी शेअर केली. त्यांच्या निधनानंतर आज दुपारी 3 वाजता हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंगभूमी ते ओटीटीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास
प्रविणा देशपांडे यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात मराठी रंगभूमीवरून केली होती. नाटकांच्या माध्यमातून अभिनयाचे बारकावे आत्मसात केल्यानंतर त्यांनी मालिका, चित्रपट आणि अलीकडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली ओळख निर्माण केली. मराठी मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या कौटुंबिक आणि संवेदनशील महिलांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिल्या. अभिनयातील सहजता आणि संवादकलेच्या जोरावर त्यांनी अनेक सहाय्यक भूमिकांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

हेही वाचा – Salim Khan Hospitalised: सलीम खान लीलावती रुग्णालयात दाखल; सलमान खानसह कुटुंबियांची रुग्णालयात धाव

बॉलीवूडमधील दमदार कामगिरी
केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी निवडक पण महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. सलमान खान आणि असिन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रेडी’ चित्रपटात त्यांनी सहकलाकाराची भूमिका केली होती. याशिवाय ‘जलेबी’, ‘एक व्हिलन’, ‘गब्बर इज बॅक’, ‘हॅक्ड’ आणि ‘ब्लॅकमेल’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. ‘द फॅमिली मॅन’ सारख्या गाजलेल्या वेब सिरीजमधील त्यांच्या कामाचेही खूप कौतुक झाले होते.

शेवटचे काम आणि चाहत्यांची श्रद्धांजली
प्रविणा देशपांडे यांनी नुकतेच नीरज पांडे यांच्या ‘तस्करी’ या वेब सिरीजमध्ये काम केले होते, ज्यामध्ये त्या इम्रान हाश्मीसोबत दिसल्या होत्या. ही त्यांची शेवटची ऑन-स्क्रीन भूमिका ठरली. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि अनेक कलाकार मंडळींनी हळहळ व्यक्त केली आहे. “एक प्रगल्भ आणि शांत स्वभावाची अभिनेत्री हरपली,” अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

हेही वाचा – अरे, मी नाना पाटेकर आहे..; दिग्दर्शकाने नानांना तब्बल 20 वर्षे काम न देण्याचं सांगितलं कारण, म्हणाले, ‘ते मला कुठेही गाठून…’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number