PM Modi Praises Sanju Samson: ‘संजू सॅमसन खरा योद्धा…’; पंतप्रधान मोदींकडून खेळाडूचं तोंड भरून कौतुक

टी-20 विश्वचषकाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन सध्या देशभर कौतुकाचा विषय ठरला आहे.

PM Modi Praises Sanju Samson: ‘संजू सॅमसन खरा योद्धा…’; पंतप्रधान मोदींकडून खेळाडूचं तोंड भरून कौतुक

PM Modi Praises Sanju Samson: भारतीय क्रिकेट संघाने 2026 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. या विजयाचा शिल्पकार ठरलेला स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन सध्या देशभर कौतुकाचा विषय ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅमसनच्या कामगिरीची विशेष दखल घेत त्याला “खरा खेळाडू” अशा शब्दांत गौरवले आहे. शुक्रवारी (3 एप्रिल) केरळमधील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदींनी सॅमसनच्या संयमाचे आणि एकाग्रतेचे उदाहरण दिले. “दबावाच्या क्षणी डगमगून न जाता कशी कामगिरी करावी, हे संजूने जगाला दाखवून दिले आहे,” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

निर्णायक क्षणी सॅमसनचा ‘विराट’ अवतार 
पंतप्रधान मोदींनी निरीक्षण नोंदवले की, जसजशी स्पर्धा बाद फेरीच्या (नॉकआउट) टप्प्यावर आली, तसतसा संजूचा खेळ अधिकच बहरत गेला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात त्याने नाबाद 97 धावांची खेळी केली. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंड आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन सामन्यांत प्रत्येकी 89 धावा कुटून त्याने भारताचा विजय सुकर केला. विशेष म्हणजे, संजूने या स्पर्धेत एकूण 321 धावा करून 2014 मध्ये विराट कोहलीने प्रस्थापित केलेला 319 धावांचा विक्रम मोडीत काढला. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ या किताबाने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – Abhishek Sharm: धडाकेबाज खेळीनंतर अभिषेक शर्माला दंडाचा फटका; ‘या’ कारणामुळे IPLची कारवाई

भारताची ऐतिहासिक ‘हॅट्ट्रिक’ आणि सॅमसनचा झंझावात
न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. अशा प्रकारे तीन वेळा विश्वचषक जिंकणारा आणि मायभूमीवर विजेतेपद पटकावणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. संजू सॅमसनने 5 डावांत 80.25 च्या सरासरीने आणि तब्बल 200 च्या स्ट्राइक रेटने धावा कुटल्या. त्याच्या बॅटमधून 27 चौकार आणि 24 षटकार पाहायला मिळाले. ‘संघाला जेव्हा गरज होती, तेव्हा संजू धावून आला, हेच एका खऱ्या खेळाडूचे लक्षण आहे,’ असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. संजू सध्या आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळत असून त्याचा हा फॉर्म चाहत्यांसाठी पर्वणी ठरत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number