Railway Jobs : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! टेक्निशियनच्या 6,565 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक आणि पात्रता

रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) टेक्निशियन (तंत्रज्ञ) या पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. जाणून घ्या, अधिक माहिती...

Railway Jobs : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! टेक्निशियनच्या 6,565 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक आणि पात्रता

RRB Technician Recruitment 2026 : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या देशातील तरुण-तरुणींसाठी भारतीय रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) टेक्निशियन (तंत्रज्ञ) या पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमधील रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वेने संक्षिप्त अधिसूचना (Short Notice) जारी केली असून, एकूण 6,565 उमेदवारांची याद्वारे निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

पदनिहाय रिक्त जागांचा सविस्तर गोषवारा
रेल्वे भरती बोर्डाच्या 'CEN 02/2026' या जाहिरातीनुसार, देशातील मध्य रेल्वे (मुंबई), दक्षिण रेल्वे (चेन्नई), उत्तर रेल्वे (नवी दिल्ली) यांसारख्या प्रमुख विभागांमध्ये ही पदे भरली जातील. भरती होणाऱ्या एकूण पदांची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:
टेक्निशियन ग्रेड-1 (सिग्नल): 323 जागा
टेक्निशियन ग्रेड-3: 6,242 जागा
एकूण रिक्त पदे: 6,565 जागा

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेचे नियम
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. टेक्निशियन ग्रेड-3 या पदासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे, तर ग्रेड-1 पदासाठी कमाल वयोमर्यादा 33 वर्षे ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सवलत मिळेल. शैक्षणिक पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत:
उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असावा.
संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) प्रमाणपत्र किंवा 'अ‍ॅक्ट अ‍ॅप्रेंटिसशिप' पूर्ण केलेली असावी.
टेक्निशियन ग्रेड-1 (सिग्नल) या पदासाठी संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील डिप्लोमा किंवा पदवी (Degree) धारक उमेदवारही पात्र ठरतील.

हेही वाचा – Kamgar Ayuktalay Bharti 2026 : कामगार विभागात सरळसेवा भरती जाहीर! तब्बल 1 लाखाहून अधिक पगाराची नोकरी; जाणून घ्या डिटेल्स

भरती प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक
रेल्वे भरती बोर्डाने या मेगाभरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत, जेणेकरून उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. या भरतीचे संपूर्ण नियम, परीक्षा पद्धत आणि फीचा तपशील असलेले सविस्तर नोटिफिकेशन 29 जून 2026 रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर लगेचच 30 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. उमेदवारांना आपले अर्ज सबमिट करण्यासाठी 29 जुलै 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

अर्जाची ऑनलाईन पद्धत आणि महत्त्वाची सूचना
– या भरतीसाठी उमेदवारांना rrbapply.gov.in या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
– होम पेजवर उपलब्ध असलेल्या ‘RRB Technician Recruitment’ च्या लिंकवर क्लिक करा.
– होम पेजवर उपलब्ध लिंकवर क्लिक करून वैयक्तिक माहिती, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीच्या साहाय्याने लॉगिन आयडी तयार करावा लागेल.
– नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करा.
– त्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून ऑनलाईन फी भरावी लागेल.
– संपूर्ण फॉर्म तपासून ‘Submit’ करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
– रेल्वे बोर्डाने उमेदवारांना आवाहन केले आहे की, फॉर्म भरताना कोणतीही चूक टाळण्यासाठी 29 जून रोजी प्रसिद्ध होणारे सविस्तर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचूनच अर्ज अंतिम करावा.

हेही वाचा – SBI Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 800 हून अधिक पदांसाठी भरती; पगार 80,000 रुपयांपर्यंत, कोण करू शकतं अर्ज?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number