Surbhi Jyoti Blessed With Baby Girl: ‘कुबूल है’ फेम सुरभी ज्योतीच्या घरी चिमुकलीचे आगमन; सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी

सुरभीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या दाम्पत्याने 27 ऑक्टोबर 2024 रोजी उत्तराखंडमध्यअत्यंत दिमाखात लग्नगाठ बांधली होती.

Surbhi Jyoti Blessed With Baby Girl: ‘कुबूल है’ फेम सुरभी ज्योतीच्या घरी चिमुकलीचे आगमन; सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी

Surbhi Jyoti Blessed With Baby Girl:  ‘कुबूल है’ या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती आणि तिचा पती सुमित सूरी यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. 13 जून 2026 रोजी सुरभीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रविवारी सुरभीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या दाम्पत्याने 27 ऑक्टोबर 2024 रोजी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट येथील ‘आहाना रिसॉर्ट’मध्ये अत्यंत दिमाखात लग्नगाठ बांधली होती.

‘आमची मने प्रेमाने भरून गेली…’
आपल्या लाडक्या लेकीच्या आगमनाची माहिती देताना सुरभीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, “आमची परी आली आहे! आमची मने सध्या प्रेम आणि कृतज्ञतेने पूर्णपणे भरून गेली आहेत.” सुरभीची ही पोस्ट सोशल मीडियावर येताच काही वेळातच व्हायरल झाली असून, तिच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव सुरू केला आहे.

हेही वाचा – ‘पाण्याने पेटला वणवा’ ऐतिहासिक मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर

कलाकारांकडून शुभेच्छा; पोस्टला हजारो लाईक्स
सुरभीच्या या आनंदाच्या क्षणात सहभागी होत अभिनेत्री हिना खानने “माशाअल्लाह” अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे, तर अभिनेत्री सुरभी चंदनानेही या पोस्टला लाईक करून आपला आनंद व्यक्त केला आहे. अवघ्या काही तासांतच या पोस्टला 55000 हून अधिक लाईक्स मिळाले असून, हजारो नेटकऱ्यांनी कमेंट्स करत चिमुकलीचे स्वागत केले आहे.

यापूर्वी सुरभीने 11 फेब्रूवारी 2026 रोजी एका खास पोस्टद्वारे चाहत्यांना ती आई होणार असल्याची माहिती दिली होती. त्या फोटोमध्ये सुरभी आणि सुमित यांच्या पायांशेजारी बाळाचे लहान पांढऱ्या रंगाचे बूट ठेवलेले दिसत होते. “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि सुंदर प्रवासाची सुरुवात होत असून, आमचे ‘लिटल लव्ह’ या जून महिन्यात येणार आहे,” असे कॅप्शन तिने त्यावेळी दिले होते, जे आता खरे ठरले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number