PV Sindhu : पीव्ही सिंधूचा ऐतिहासिक पराक्रम! ‘हा’ विजय मिळवणारी ठरली पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू

दरम्यान, 43 मिनिटांच्या या चुरशीच्या लढतीत सिंधूने कमालीचा संयम दाखवला. आता क्वार्टर फायनलमध्ये तिचा सामना जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या चेन यू फीशी होणार आहे.

PV Sindhu : पीव्ही सिंधूचा ऐतिहासिक पराक्रम! ‘हा’ विजय मिळवणारी ठरली पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू

PV Sindhu : भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने इंडोनेशिया मास्टर्स 500 स्पर्धेत विजय मिळवत जागतिक बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला आहे. प्री-क्वार्टर फायनलमध्ये डेन्मार्कच्या लाईन होजमार्क कज़रफेल्ड्टचा 21-19, 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत सिंधूने केवळ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला नाही, तर आपल्या कारकिर्दीतील 500 वा एकेरी विजय (500th Career Win) नोंदवला. ही थक्क करणारी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली असून, जागतिक स्तरावर असा टप्पा गाठणारी ती सहावी महिला खेळाडू ठरली आहे. 

दरम्यान, 43 मिनिटांच्या या चुरशीच्या लढतीत सिंधूने कमालीचा संयम दाखवला. आता क्वार्टर फायनलमध्ये तिचा सामना जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या चेन यू फीशी होणार आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत 13 सामने झाले असून, सिंधूने 6 वेळा विजय मिळवला आहे.

हेही वाचा – Suryakumar Yadav : नागपूरच्या मैदानात सूर्याची 'विराट' खेळी; रोहित-कोहलीलाही जे जमलं नाही, ते सूर्याने करून दाखवलं

लक्ष्य सेनचीही शानदार आगेकूच

पीव्ही सिंधू सोबतच पुरुष गटात भारताच्या लक्ष्य सेन यानेही आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. लक्ष्य सेनने प्री-क्वार्टर फायनलमध्ये हाँगकाँगच्या जेसन गुणवानचा 21-10 आणि 21-11 अशा फरकाने अवघ्या अर्ध्या तासात धुव्वा उडवला. या विजयासह लक्ष्यने इंडोनेशिया मास्टर्सच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली असून, आता त्याचा सामना थायलंडच्या पक्कापोन तिरारात्साकुलशी होणार आहे. दोन्ही भारतीय स्टार खेळाडूंकडून आता जेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number