PM Modi Oman Visit: भारत-ओमान मैत्रीचा नवा अध्याय; पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च सन्मान

ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी गुरुवारी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल हा सन्मान पंतप्रधान मोदींना प्रदान केला.

PM Modi Oman Visit: भारत-ओमान मैत्रीचा नवा अध्याय; पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च सन्मान

PM Modi Oman Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमानचा सर्वोच्च राष्ट्रीय नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ ओमान' प्रदान करण्यात आला. ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी गुरुवारी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल हा सन्मान पंतप्रधान मोदींना प्रदान केला. दोन दिवसांच्या ओमान दौऱ्यादरम्यान हा गौरव करण्यात आला असून, पंतप्रधान मोदींना आतापर्यंत मिळालेल्या 28 सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नागरी सन्मानांपैकी हा एक आहे.

दरम्यान, 3 देशांच्या दौऱ्यांतर्गत पंतप्रधान मोदी यांनी जॉर्डन आणि इंडोनेशियालाही भेट दिली आहे. ओमानपूर्वी त्यांना इथिओपियामध्ये 'ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इथिओपिया' आणि कुवेतमध्ये 'ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर' या सर्वोच्च सन्मानांनी गौरवण्यात आले होते. भारत आणि ओमानमधील राजनैतिक संबंधांच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदी ओमानच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी मस्कत येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

हेही वाचा – India-Afghanistan Relations: भारत-अफगाणिस्तानमध्ये पारंपरिक औषध प्रणालीतील सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा

या दौऱ्यादरम्यान भारत आणि ओमान यांच्यात मुक्त व्यापार करार (FTA) तसेच व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) वर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि सुलतान हैथम बिन तारिक यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चांमध्ये व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, शेती, तंत्रज्ञान, उदयोन्मुख क्षेत्रे, संस्कृती आणि लोकांमधील संपर्क या विषयांवर सखोल विचारविनिमय झाला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, CEPA कराराला दोन्ही देशांनी ऐतिहासिक पाऊल म्हणून संबोधले असून, यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळेल. पंतप्रधान मोदी यांनीही हा करार भारत-ओमान संबंधांमध्ये नवी ऊर्जा आणि विश्वास निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा – Indian Currency in Nepal : नेपाळमध्ये आता 500 आणि 200 च्या भारतीय नोटांना परवानगी; पर्यटकांना मोठा दिलासा

ओमान हा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांमध्ये भारताचा 3रा सर्वात मोठा निर्यात गंतव्य देश आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भारत-ओमान द्विपक्षीय व्यापार सुमारे 10.5 अब्ज डॉलर्सचा असल्याचा अंदाज असून, यामध्ये भारतीय निर्यात 4 अब्ज डॉलर्स तर आयात 6.54 अब्ज डॉलर्स इतकी आहे. या करारांमुळे भविष्यात व्यापार आणि आर्थिक सहकार्य आणखी विस्तारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number