Shreyas Iyer Captaincy : श्रेयस अय्यर कॅप्टन होताच पंजाबच्या किंग्सच्या खेळाडूंना ‘लॉटरी’; झिम्बाब्वे दौऱ्यासाठी या शिलेदारांची भारतीय संघात एन्ट्री

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय टी20 संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये पंजाब किंग्सच्या खेळाडूंना विशेष प्राधान्य मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

Shreyas Iyer Captaincy : श्रेयस अय्यर कॅप्टन होताच पंजाबच्या किंग्सच्या खेळाडूंना ‘लॉटरी’; झिम्बाब्वे दौऱ्यासाठी या शिलेदारांची भारतीय संघात एन्ट्री

PBKS Player in Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी20 संघाच्या नेतृत्वाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवली आहे. श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद येताच आयपीएलमधील पंजाब किंग्सच्या खेळाडूंसाठी जणू भाग्योदय झाला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय टी20 संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये पंजाब किंग्सच्या खेळाडूंना विशेष प्राधान्य मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघात पंजाबच्या एका नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 3 खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले असून, यामुळे क्रिकेट वर्तुळात श्रेयसच्या कर्णधारपद मिळाल्यानंतरच्या नव्या रणनीतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रभसिमरन आणि यश ठाकूरची निवड; वेगवान गोलंदाजाबाबत प्रश्नचिन्ह
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी नव्याने जाहीर झालेल्या या टी20 संघात पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या प्रभसिमरन सिंह आणि यश ठाकूर यांना थेट संधी देण्यात आली आहे. प्रभसिमरन सिंहने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याची निवड होणे अपेक्षित मानले जात होते. मात्र, वेगवान गोलंदाज यश ठाकूरच्या निवडीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयपीएल 2026 च्या हंगामात साकिब हुसैन, रासिक डार आणि कार्तिक त्यागी यांसारख्या इतर वेगवान गोलंदाजांनी यश ठाकूरच्या तुलनेत अत्यंत प्रभावी कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले होते. त्यामुळे चांगल्या कामगिरीचे पर्याय उपलब्ध असतानाही यशची निवड झाल्याने क्रिकेट तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हेही वाचा – Suryakumar Yadav : "माझ्या नावावर खोटं नाटं खपवलं" टीम इंडियाच्या बदलांपासून ते वैभव सूर्यवंशीच्या फॉर्मवर स्पष्टच बोलला माजी कर्णधार

सूर्यांश शेडगेलाही मिळाले भारतीय संघात स्थान
पंजाब किंग्सच्या गोटातून केवळ प्रभसिमरन आणि यश ठाकूर हे दोनच खेळाडू भारतीय संघात आलेले नाहीत, तर त्यापूर्वीच सूर्यांश शेडगे यानेही टीम इंडियात आपले स्थान पक्के केले आहे. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या जागी योग्य रिप्लेसमेंट (बदली खेळाडू) म्हणून सूर्यांश शेडगेला तातडीने भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची चमक दाखवण्याची मोठी संधी मिळाली आहे.

युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष
एकंदरीत पाहता, श्रेयस अय्यरकडे नेतृत्व येताच पंजाब किंग्सच्या या 3 खेळाडूंची भारतीय संघात झालेली एन्ट्री ही आगामी काळातील मोठ्या बदलांची नांदी मानली जात आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंना आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे. झिम्बाब्वेसारख्या दौऱ्यावर श्रेयस अय्यर या युवा ब्रिगेडला सोबत घेऊन कशा प्रकारे संघाची बांधणी करतो आणि हे खेळाडू कर्णधाराचा विश्वास कसा सार्थ ठरवतात, याकडे आता सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे बारीक लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Prithvi Shaw Akriti Agarwal Relationship: साखरपुड्यानंतर अवघ्या 4 महिन्यांतच पृथ्वी शॉच्या नात्यात दुरावा? आकृती अग्रवालच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number