Shocking Incident : संतापजनक! झोमॅटोवरून मागवलेल्या बिर्याणीत ‘कुत्र्याचा पाय’? व्हिडिओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

एका व्यक्तीने झोमॅटोवरून (Zomato) चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली होती, मात्र त्या अन्नात चक्क 'कुत्र्याचा पाय' असल्याचा दावा या ग्राहकाने केला आहे.

Shocking Incident : संतापजनक! झोमॅटोवरून मागवलेल्या बिर्याणीत ‘कुत्र्याचा पाय’? व्हिडिओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Shocking Incident : ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून जेवण मागवणे एका ग्राहकासाठी अत्यंत धक्कादायक अनुभव ठरले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका व्यक्तीने झोमॅटोवरून (Zomato) चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली होती, मात्र त्या अन्नात चक्क ‘कुत्र्याचा पाय’ असल्याचा दावा या ग्राहकाने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने ऑनलाइन बिर्याणी मागवली होती. पार्सल मिळाल्यानंतर जेव्हा त्याने खाण्यासाठी डबा उघडला, तेव्हा त्यात त्याला एक विचित्र हाडाचा तुकडा आढळला. ग्राहकाच्या दाव्यानुसार, हा तुकडा चिकनचा नसून त्याचा आकार हुबेहूब कुत्र्याच्या पंजासारखा दिसत होता. हा प्रकार पाहून हादरलेल्या ग्राहकाने तात्काळ या घटनेचे चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले.

सोशल मीडियावर ‘कुत्ता बिर्याणी’ ट्रेंड
X (ट्विटर) वर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी याला ‘कुत्ता बिर्याणी’ म्हणत संबंधित रेस्टॉरंटवर कडक कारवाईची मागणी केली आहे. “आम्ही पैसे देऊन काय खातोय?” असा संतप्त सवाल विचारत, फूड डिलिव्हरी कंपन्यांनी रेस्टॉरंटच्या स्वच्छतेची तपासणी करणे बंधनकारक करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रशासन आणि कंपनीची भूमिका
या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होऊनही अद्याप झोमॅटो कंपनी किंवा स्थानिक अन्न प्रशासन विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. ही बिर्याणी नेमक्या कोणत्या हॉटेलमधून आली होती, याचीही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या एका घटनेमुळे ऑनलाइन जेवण मागवणाऱ्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – Dog Photo On Hall Ticket: हद्द झाली! उमेदवाराच्या हॉल तिकीटावर चक्क कुत्र्याचा फोटो; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

अन्न सुरक्षेबाबत गंभीर इशारा
अन्नात अळ्या किंवा झुरळे सापडण्याच्या घटना आतापर्यंत ऐकल्या होत्या, मात्र थेट प्राण्याचा अवयव सापडल्याच्या दाव्याने अन्न सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे काढले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number