Duleep Trophy 2026 : दुलीप करंडकसाठी नॉर्थ झोनचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

या संघात भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा समावेश करण्यात आला असून दिल्लीच्या यश धुलची उपकर्णधारपदी निवड झाली आहे.

Duleep Trophy 2026 : दुलीप करंडकसाठी नॉर्थ झोनचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

Duleep Trophy 2026 :  आगामी 2026-27 च्या दुलीप करंडक स्पर्धेसाठी नॉर्थ झोनच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने जम्मू-काश्मीरच्या कन्हैया वाधवानकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या संघात भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा समावेश करण्यात आला असून दिल्लीच्या यश धुलची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडू आयुष बदोनी यानेही संघात आपले स्थान निश्चित केले आहे. नॉर्थ झोनचा पहिला सामना ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील वेस्ट झोनविरुद्ध होणार आहे.

रणजी विजेत्या जम्मू-काश्मीरचे संघात वर्चस्व
गेल्या हंगामात रणजी करंडक विजेतेपद पटकावणाऱ्या जम्मू-काश्मीर संघातील तब्बल 6 खेळाडूंनी नॉर्थ झोनच्या संघात स्थान मिळवले आहे. कर्णधार कन्हैया वाधवानशिवाय सलामीवीर कामरान इक्बाल, मधल्या फळीतील फलंदाज अब्दुल समद, डावखुरा अष्टपैलू आबिद मुश्ताक तसेच वेगवान गोलंदाज सुनील कुमार आणि युद्धवीर सिंग यांचा या संघात समावेश आहे.

खेळाडूंची मागील हंगामातील उल्लेखनीय कामगिरी
मागील रणजी हंगामात अब्दुल समदने 15 डावांत 57.53 च्या सरासरीने सर्वाधिक 748 धावा कुटल्या होत्या. तसेच कन्हैया वाधवानने 13 डावांत 36.46 च्या सरासरीने 474 धावा केल्या. कामरान इक्बालने कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात नाबाद 160 धावांची चमकदार खेळी केल्यामुळे त्याला पहिल्यांदाच दुलीप करंडक संघात संधी मिळाली आहे. दुसरीकडे, आबिद मुश्ताकने 445 धावा करत 20 बळी घेतले असून तो निशांत सिंधूसोबत फिरकी अष्टपैलूची भूमिका निभावेल.

वेगवान गोलंदाजीची फळी अन् सामन्याचे वेळापत्रक
नॉर्थ झोनच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व अर्शदीप सिंग करेल, ज्याला जम्मू-काश्मीरच्या युधवीर सिंग व सुनील कुमार आणि हरियाणाच्या अंशुल कंबोजची साथ लाभेल. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा आकिब नबी भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर असल्याने या संघात उपलब्ध नाही. नॉर्थ झोनचा पहिला सामना 23 ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) मैदानावर वेस्ट झोनविरुद्ध रंगणार आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: "अगदी सुरुवातीपासूनच संपूर्ण यंत्रणा…" बृजभूषण सिंह यांची निर्दोष सुटका, विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया

दुलीप ट्रॉफी 2026 साठी नॉर्थ झोनचा 15 सदस्यीय संघ
कन्हैया वाधवान (कर्णधार व यष्टिरक्षक), सनत सांगवान, कामरान इक्बाल, यश धुल, आयुष दोसेजा, अब्दुल समद, आयुष बदोनी (उपकर्णधार), निशांत सिंधू, अर्जुन शर्मा, आबिद मुश्ताक, अर्शदीप सिंग, सुनील कुमार, अंशुल कंबोज, युधवीर सिंग, निखिल कश्यप.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number