मुंबई : गेल्या 48 तासांपासून कोसळत असलेला पाऊस आज, बुधवारी सौम्य स्वरुपात पडत आहे. रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसानं पहाटेपासून रिमझिम बरसण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बुधवारी पहाटेपासून मुंबईतील पावसानं उसंत घेतल्यामुळे येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र दुसरीकडे ठाण्यात अजूनही मुसळधार पाऊस बरसत आहे. ठाण्यातील सर्व शाळांना आज सुटी देण्यात आली असून मुंबईतील शाळा आज सुरू आहेत. तर पश्चिम रेल्वे सेवा सुरळीत सुरू असून मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या 15 ते 20 मिनिटांनी उशीराने धावत आहेत.