FIFA World Cup 2026: कॅनडातील फिफा वर्ल्डकप उद्घाटन सोहळ्यात नोरा फतेहीचा धमाकेदार परफॉर्मन्स; लाल पोशाखात केला धमाकेदार डान्स

अभिनेत्री आणि डान्सिंग स्टार नोरा फतेहीने फिफा विश्वचषक 2026 च्या कॅनडातील उद्घाटन सोहळ्यात आपल्या अद्भूत नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

FIFA World Cup 2026: कॅनडातील फिफा वर्ल्डकप उद्घाटन सोहळ्यात नोरा फतेहीचा धमाकेदार परफॉर्मन्स; लाल पोशाखात केला धमाकेदार डान्स

FIFA World Cup 2026: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सिंग स्टार नोरा फतेहीने फिफा विश्वचषक 2026 च्या कॅनडातील उद्घाटन सोहळ्यात आपल्या अद्भूत नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. शुक्रवार, 12 जून 2026 रोजी झालेल्या या सोहळ्यात नोराने स्टेजवर प्रचंड ऊर्जा दाखवली. तिच्या या सादरीकरणाचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झाले असून जगभरातील चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. टोरंटो येथे कॅनडा आणि बोस्निया यांच्यात रंगलेल्या ‘ग्रुप B’ मधील फुटबॉल सामन्यादरम्यान हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.

‘सीर सीर’ फुटबॉल अँथमवर थिरकले शेकडो नर्तक
या सोहळ्यात नोरा फतेहीने गायक वेजड्रीम (Vegedream) आणि संजॉय (Sanjoy) यांच्यासोबत मिळून ‘सीर सीर’ (Siir Siir) हे फुटबॉल अँथम सादर केले. या सादरीकरणाचा एक व्हिडिओ फिफा विश्वचषक, वेजड्रीम आणि संजॉय यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून संयुक्तपणे (Collaboration) शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये नोरा लाल रंगाच्या ‘कट-आउट’ डिझाईनच्या आकर्षक पोशाखात आणि तिच्या सिग्नेचर ‘वेव्ही’ हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. मंचावर तिच्यासोबत शेकडो बॅकग्राउंड नर्तकांनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे या परफॉर्मन्सची भव्यता आणखी वाढली.

उद्घाटन सोहळ्याला दिग्गज कलाकारांची उपस्थिती
कॅनडातील या दिमाखदार सोहळ्यात नोराव्यतिरिक्त ॲलानिस मॉरिसेट, ॲलेसिया कारा, मायकल बुब्ले, जेसी रेयेझ, एलियाना, विल्यम प्रिन्स यांसारख्या नामवंत आंतरराष्ट्रीय कलाकारांनीही आपली कला सादर केली. दुसरीकडे, अमेरिकेतील लॉस एंजेलिस (LA) येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्यात ‘रोअर’ फेम गायिका केटी पेरी हिने धुमाकूळ घातला. केटी पेरीने अनिता, फ्युचर, लिसा, रेमा आणि टायला या कलाकारांसह मंचावर परफॉर्म केले. यंदाच्या 2026 च्या फिफा विश्वचषकात अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांमध्ये एकूण 48 संघ विजेतेपदासाठी लढणार असून, या स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै 2026 रोजी खेळवला जाईल.

हेही वाचा – Pranit More Apology: ‘370 रुपयांची बिर्याणी’ प्रकरणानंतर प्रणित मोरे पहिल्यांदाच समोर, माफी मागत म्हणाला, ‘या टीकेला एका अर्थी मी पात्रच…’

नोरा फतेहीचे आगामी चित्रपट आणि वर्क फ्रंट
नोरा फतेहीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, ती नुकतीच ‘उफ्फ ये सियापा’ (Ufff Yeh Siyapaa) या मूक-कॉमेडी चित्रपटात नुसरत भरुचा, सोहम शाह आणि शारिब हाश्मी यांच्यासोबत झळकली होती. याशिवाय, संजय दत्त, शिल्पा शेट्टी आणि ध्रुव सर्जा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘केडी: द डेव्हिल’ (KD: The Devil) या कन्नड चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यात तिने विशेष परफॉर्मन्स दिला आहे. आता नोरा लवकरच राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘कांचना 4’ (Kanchana 4) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number