Vaibhav Suryavanshi: शतक हुकलं तरी गाजवला सामना; 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची तिसऱ्या T20 मध्ये धडाकेबाज कामगिरी

कोणत्याही फॉरमॅटमध्ये वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 अर्धशतके झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Vaibhav Suryavanshi: शतक हुकलं तरी गाजवला सामना; 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची तिसऱ्या T20 मध्ये धडाकेबाज कामगिरी

Vaibhav Suryavanshi: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्यादरम्यान 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 अर्धशतके झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी क्रिकेटच्या दीर्घ इतिहासात कोणत्याही खेळाडूला इतक्या कमी वयात अशी कामगिरी करता आली नव्हती. रविवारी, 26 जुलै रोजी झालेल्या या सामन्यात त्याने अवघ्या 31 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. 

19 धावांनी हुकलं शतक  

या मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने अर्धशतक ठोकले होते. याआधी नेपाळच्या कुशल मल्लाने 15 व्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये 1 अर्धशतक केले होते, मात्र वैभवने दोनदा 50 हून अधिक धावा करून त्याला मागे टाकले आहे. या तिसऱ्या T20 सामन्यात वैभवचे शतक अवघ्या 19 धावांनी हुकले असले तरी त्याने 49 चेंडूंमध्ये 81 धावांची तुफानी खेळी केली. 

हेही वाचा – FIH Youth Hockey5s Asian Championship: मस्कतमध्ये तिरंगा फडकला! पाकिस्तानचा पराभव करत भारताने 'हॉकी 5-एस विश्वचषका'त पटकावले विजेतेपद

8 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार  

आपल्या या धडाकेबाज खेळीत त्याने 8 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार मारले. मधवेरेच्या गोलंदाजीवर इव्हान्सने टिपलेल्या सुरेख झेलमुळे त्याची ही खेळी संपुष्टात आली. एरवी 200 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या वैभवने या सामन्यात 165.35 च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या. त्याच्या या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाचे आता झिम्बाब्वेविरुद्ध 3-0 असा 'क्लीन स्वीप' देण्याचे स्पष्ट उद्दिष्ट आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number