Squadron Leader Priya Sharma : 62 वर्षांच्या सेवेनंतर मिग-21 चा निरोप; स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा रचणार इतिहास

या समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील आणि MiG-21 च्या निरोपाची आठवण म्हणून ते एक स्मारक टपाल तिकीट (commemorative postal stamp) देखील प्रकाशित करतील.

Squadron Leader Priya Sharma : 62 वर्षांच्या सेवेनंतर मिग-21 चा निरोप; स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा रचणार इतिहास

चंदीगड : भारतीय हवाई दलाचे (IAF) सामर्थ्य वाढवणारे प्रतिष्ठित मिग-21 (MiG-21) लढाऊ विमान तब्बल 62 वर्षांच्या दिमाखदार सेवेनंतर 26 सप्टेंबर 2025 रोजी आपली अंतिम झेप घेणार आहे. या ऐतिहासिक क्षणाची नोंद घेण्यासाठी चंदीगड एअर फोर्स स्टेशनवर भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याच तळावर 1963 मध्ये मिग-21 विमानांचा भारतीय हवाई दलात पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता.

स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा यांची ऐतिहासिक उपस्थिती
या सुपरसॉनिक जेटच्या निरोप समारंभाच्या औपचारिक फ्लाय-पास्टमध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा सहभागी होणार आहेत. त्या IAF च्या निवडक महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक असून, मिग-21 मधून अंतिम उड्डाण करणाऱ्या शेवटच्या महिला पायलट ठरण्याचा मान त्यांना मिळणार आहे.

प्रिया शर्मा कोण आहेत?
– प्रिया शर्मा या 2018 मध्ये डुंडीगल येथील एअर फोर्स ॲकॅडमीतून उत्तीर्ण झाल्या.
– त्या IAF च्या सातव्या महिला लढाऊ पायलट आहेत. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते त्यांना फ्लाइंग ऑफिसर म्हणून कमिशन देण्यात आले होते.
– त्यांच्या बॅचमध्ये त्या एकमेव महिला लढाऊ वैमानिक होत्या.
– राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्याच्या मूळ रहिवासी असलेल्या प्रिया यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हवाई दलात प्रवेश केला.
– या वर्षाच्या सुरुवातीला बिकानेर एअर फोर्स स्टेशनवरील निरोप उड्डाणांमध्ये सहभागी होऊन त्यांनी मिग-21 च्या वारसामध्ये आपले नाव नोंदवले आहे.

हेही वाचा – MIG-21 : भारतीय हवाई दलाचे 'मिग-21' घेणार अंतिम झेप; 1965 आणि 1971 च्या युद्धातील 'आकाश-योद्धा' निवृत्त

निवृत्ती समारंभात काय असेल?
– उद्या होणाऱ्या समारंभात मिग-21 ची शेवटची ऑपरेशनल स्क्वॉड्रन – नंबर 23 पँथर्स (Number 23 Panthers) – वॉटर कॅनन सॅल्यूट देणार आहे आणि औपचारिक फॉर्मेशन्स सादर करेल.
– हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग (Air Chief Marshal AP Singh) हे 'बादल 3' (Badal 3) या कॉल साइनसह मिग-21 चे अंतिम उड्डाण करतील.
– नंबर 23 स्क्वॉड्रनची विमाने बादल आणि पॅंथर फॉर्मेशन्समध्ये फ्लायपास्ट करतील.
– 'आकाश गंगा' स्कायडायव्हिंग टीम 8,000 फुटांवरून उडी मारून या कार्यक्रमाची सुरुवात करेल.
– सूर्य किरण एअरोबॅटिक टीम चित्तथरारक कवायतींचे प्रदर्शन करेल.
– विमानांना त्यांच्या अंतिम लँडिंगनंतर वॉटर कॅनन सॅल्यूट दिला जाईल.
या समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील आणि या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून ते एक स्मारक टपाल तिकीट (commemorative postal stamp) देखील प्रकाशित करतील.

हेही वाचा – Tejas Jet Deal With HAL: संरक्षण मंत्रालयाचा HAL सोबत ऐतिहासिक करार! हवाई दलाला मिळणार 97 तेजस Mk1A लढाऊ विमानं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number