Lionel Messi: मेस्सी टी20 विश्वचषक पाहण्यासाठी पुन्हा भारतात येणार; जय शाहांनी फुटबॉलपटूला दिली ‘ही’ खास भेट

या कार्यक्रमाला आयसीसीचे अध्यक्ष जय शाह उपस्थित होते. त्यांनी मेस्सीशी भेट घेऊन आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मधील सामन्यांसाठी त्यांना औपचारिक आमंत्रण दिले.

Lionel Messi: मेस्सी टी20 विश्वचषक पाहण्यासाठी पुन्हा भारतात येणार; जय शाहांनी फुटबॉलपटूला दिली ‘ही’ खास भेट

Lionel Messi: अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर असून सोमवारी त्याने राजधानी दिल्लीत आगमन केले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात मेस्सीचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्याला भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाला आयसीसीचे अध्यक्ष जय शाह उपस्थित होते. त्यांनी मेस्सीशी भेट घेऊन भारत आणि अमेरिका संयुक्तपणे आयोजित करणार असलेल्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मधील सामन्यांसाठी त्यांना औपचारिक आमंत्रण दिले. जय शाह यांनी मेस्सीला सामन्याचे तिकीट सुपूर्द केले, तसेच लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांनाही खास डिझाइन केलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी भेट दिल्या.

भारतातील प्रेमाबद्दल मेस्सी भावूक

दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना लिओनेल मेस्सीने भारतात मिळालेल्या प्रेम आणि आत्मीयतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 'भारतामधील अनुभव अत्यंत खास आहे. आम्ही आमच्यासोबत खूप प्रेम घेऊन जात आहोत. भविष्यात सामना खेळण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी भारतात परत येण्याची मला नक्कीच इच्छा आहे,' असं मेस्सीने यावेळी म्हटलं.  

हेही वाचा – Squash World Cup मध्ये भारताने रचला इतिहास; हाँगकाँगवर 3-0 ची दणदणीत मात

चाहत्यांसोबत खास क्षण

स्टेडियममध्ये पोहोचताच मेस्सीने उपस्थित चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले. त्यानंतर सुआरेझ आणि डी पॉलसह मैदानात फुटबॉल खेळत त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. यावेळी एक फटका थेट स्टेडियमच्या 2ऱ्या मजल्यावर पोहोचला. लहान मुलांसोबत फुटबॉल खेळत मेस्सीने हा कार्यक्रम आणखी संस्मरणीय केला.

हेही वाचा – T20 Cricket: टी-20चा नवीन चेस मास्टर! 'या' खेळाडूने मोडला विराट कोहलीचा विक्रम

भारतात रंगणार टी-20 विश्वचषक

भारत आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मधील आपला पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाशी सामना होईल. भारताचा तिसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध, तर 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध खेळला जाणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number