BCCI Annual General Meeting: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) 95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी मुंबईतील मुख्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत आगामी काळातील प्रशासकीय, आर्थिक आणि क्रीडा विकासाशी संबंधित 10 मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये 2 नवीन प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अरुण सिंह धुमल आणि एम. खैरुल जमाल मजुमदार यांची सर्वसाधारण सभेतर्फे आयपीएल नियामक परिषदेवर अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, वर्ष 2027 मध्ये होणारा इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 20 वा हंगाम अत्यंत दणक्यात साजरा करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. सर्वात विशेष म्हणजे, बीसीसीआयच्या स्थापना शताब्दी वर्षाच्या निमित्ताने डिसेंबर 2027 पासून वर्षभर विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करून 2028 मध्ये शताब्दी सोहळा दणक्यात साजरा केला जाणार आहे.
? News ? Update: 95th Annual General Meeting of BCCI The 95th Annual General Meeting of the Board of Control for Cricket in India (BCCI) was held on September 18, 2026, at BCCI HQ, in Mumbai. Click below for all the key details ▶️ https://t.co/BHR2I01cbn — BCCI (@BCCI) September 18, 2026
पंच अन् मॅच रेफ्रींच्या मानधनात घसघशीत वाढ
वार्षिक सभेदरम्यान बीसीसीआयने आर्थिक शिस्तीवर भर देत 2025-26 या वर्षाच्या लेखापरीक्षित हिशेबपत्रकाला आणि 2026-27 च्या नवीन वार्षिक अर्थसंकल्पाला एकमुखाने मंजुरी दिली. नवीन आर्थिक वर्षासाठी नवीन लेखापरीक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावरील पंच आणि मॅच रेफ्री यांच्या वेतनरचनेत सुधारणा करत त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा आणि श्रेणींची पुनर्रचना करण्याचा ऐतिहासिक निर्णय यावेळी घेण्यात आला.
दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी विशेष सुविधा देणार
खेळातील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी बीसीसीआयने वय पडताळणी धोरण अद्ययावत करून ते लागू केले आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या व खेळाडूंच्या सुरक्षेसाठी लैंगिक छळ प्रतिबंधक धोरणाचा पुनर्आढावा घेऊन नवीन अंतर्गत समिती गठीत करण्यात आली आहे. तळागाळातील आणि दिव्यांग क्रिकेटपटूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य क्रिकेट संघटनांशी समन्वय साधून त्यांना आधुनिक प्रशिक्षण सुविधा, संसाधने आणि आर्थिक पाठबळ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला.