FIFA World Cup 2026: लिओनेल मेसी ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत अव्वल; सलग 8 विश्वचषक सामन्यांत गोल करत रचला नवा इतिहास

या महत्त्वाच्या सामन्यात मेसीने एक अप्रतिम गोल डागला, ज्यामुळे तो या चालू विश्वचषकात 'गोल्डन बूट'च्या शर्यतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

FIFA World Cup 2026: लिओनेल मेसी ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत अव्वल; सलग 8 विश्वचषक सामन्यांत गोल करत रचला नवा इतिहास

FIFA World Cup 2026: FIFA विश्वचषक 2026 मधील 'राऊंड ऑफ 32' चे थरारक सामने 4 जुलैच्या सकाळी पूर्ण झाले असून, आता सर्व फुटबॉलप्रेमींचे लक्ष आगामी 'प्री-क्वार्टर फायनल' लढतींकडे वेधले गेले आहे. या फेरीत गतविजेत्या अर्जेंटिनाने दिमाखात प्रवेश केला आहे. 'राऊंड ऑफ 32' च्या सामन्यात अर्जेंटिनासमोर केप वर्डेचे तगडे आव्हान होते; मात्र स्टार खेळाडू आणि कर्णधार लिओनेल मेसीच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाने हा सामना 3-2 असा जिंकला. या महत्त्वाच्या सामन्यात मेसीने एक अप्रतिम गोल डागला, ज्यामुळे तो या चालू विश्वचषकात 'गोल्डन बूट'च्या शर्यतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याच सोबतीने, सलग 8 विश्वचषक सामन्यांमध्ये किमान एक गोल नोंदवणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.

'गोल्डन बूट'साठी मेसी आणि एम्बाप्पे यांच्यात कांटे की टक्कर
लिओनेल मेसीने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आतापर्यंत एकदाही प्रतिष्ठित 'गोल्डन बूट' पुरस्कार पटकावलेला नाही, पण या वर्षी त्याच्याकडे हा बहुमान मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. सध्या मेसी एकूण 7 गोलसह या शर्यतीत अग्रस्थानी आहे. केप वर्डेविरुद्धचा गोल हा मेसीच्या विश्वचषक कारकिर्दीतील एकूण 20 वा गोल ठरला असून, विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान गाठले आहे. मात्र, त्याला फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेकडून जोरदार टक्कर मिळत आहे, ज्याने आतापर्यंत 6 गोल केले आहेत. या शर्यतीत नॉर्वेचा एर्लिंग हॅलंड आणि इंग्लंडचा हॅरी केन हे दोघे प्रत्येकी 5 गोलसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

FIFA विश्वचषक 2026 मधील सर्वाधिक गोल करणारे टॉप खेळाडू:

लिओनेल मेसी (अर्जेंटिना) – 7 गोल
किलियन एम्बाप्पे (फ्रान्स) – 6 गोल
एर्लिंग हॅलंड (नॉर्वे) – 5 गोल
हॅरी केन (इंग्लंड) – 5 गोल

हेही वाचा – Cristiano Ronaldo Retirement: क्रिस्टियानो रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून होणार निवृत्त? बहीण काटियाचा मोठा दावा

'राऊंड ऑफ 16' मध्ये अर्जेंटिनासमोर इजिप्तचे आव्हान
'राऊंड ऑफ 32' मधील अटीतटीचा सामना जिंकल्यानंतर, आता प्री-क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना इजिप्तशी होणार आहे. इजिप्तने 'राऊंड ऑफ 32' मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर, पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. आता मोक्याच्या 'राऊंड ऑफ 16' च्या सामन्यात अर्जेंटिना आणि इजिप्तचा संघ 7 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता आमनेसामने येतील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number