Kyle Jamieson warned Over Vaibhav Sooryavanshi : आयपीएलच्या मैदानात 15 वर्षांच्या चिमुरड्या फलंदाजाला बाद केल्यानंतर अंगावर धावून जाणाऱ्या कायली जेमिसनला बीसीसीआयने चांगलाच धडा शिकवला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज जेमिसनने वैभव सूर्यवंशीची विकेट घेतल्यावर त्याने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले, ते आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन मानले गेले आहे. अतिआक्रमक जल्लोष करताना मर्यादा ओलांडल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट बोर्डाने वेळ न घालवता या 6.8 फूट उंचीच्या खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई केली असून त्याला 1 ‘डिमेरिट पॉईंट’ सुनावला आहे.
जेमिसनची ‘अशी’ रणनीती आणि वैभवची विकेट
दिल्लीकडून डावातील दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या कायली जेमिसनने सुरुवातीला वैभवकडून मार खाल्ला होता. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच बॉलवर जेमिसनला खणखणीत चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले होते. मात्र, जेमिसनने चतुर रणनीती आखत दुसऱ्या बॉलवर एका सेकंदाचा ‘पॉज’ घेतला आणि अचूक यॉर्कर टाकला. या अचानक बदललेल्या गतीमुळे वैभव गोंधळला आणि त्याचा थेट त्रिफळा उडाला. दिल्लीसाठी ही अतिशय महत्त्वाची विकेट होती, कारण वैभव मोठ्या खेळीच्या तयारीत दिसत होता.
? Kyle Jamieson has been warned and handed one demerit point for his aggressive celebration after dismissing Vaibhav Sooryavanshi Jamieson was in breach of Article 2.5 of the IPL's Code of Conduct #IPL2026 #RRvsDC pic.twitter.com/GB9bRvwUSy — Cricbuzz (@cricbuzz) May 2, 2026
मैदानातील तो आक्रमकपणा भोवला
वैभवला बाद केल्यानंतर मात्र, जेमिसनचा ताबा सुटला आणि तो त्याच्या दिशेने रागाने धावत गेला. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या दृश्यांमध्ये जेमिसन वैभवच्या अंगावर धावून जातोय असे स्पष्ट दिसत होते. आयपीएल आचारसंहितेतील कलम 2.5 नुसार, फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याच्या दिशेने चिथावणीखोर वर्तन करणे हा गुन्हा मानला जातो. जेमिसनवर कोणतीही आर्थिक दंडात्मक कारवाई झाली नसली, तरी त्याच्या शिस्तविषयक रेकॉर्डवर 1 डिमेरिट पॉईंटची नोंद करण्यात आली आहे.
An in-swinging yorker ?? ? Kyle Jamieson gets Vaibhav Sooryavanshi early ? Wait for the celebration ? Updates ▶️ https://t.co/6OOjzHtZiD#TATAIPL | #KhelBindaas | #RRvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/6vxJ5ahlb3 — IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026
विराट कोहलीच्या संयमाची जोरदार चर्चा
जेमिसनच्या या कृत्यानंतर चाहत्यांना काही दिवसांपूर्वीच्या विराट कोहलीच्या त्या कृतीची आठवण झाली. विराट कोहलीनेही वैभव सूर्यवंशीचा कॅच पकडला होता, पण त्याने कोणताही जल्लोष केला नव्हता. “इतक्या लहान पोराची विकेट घेतल्यावर काय नाचायचं?” अशी भावना कोहलीच्या प्रतिक्रियेतून उमटली होती, ज्याचे अनेकांनी कौतुक केले होते. एका बाजूला कोहलीचा तो समजूतदारपणा आणि दुसऱ्या बाजूला जेमिसनचा हा आक्रमक अवतार, यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा
बीसीसीआयने या कारवाईतून स्पष्ट संकेत दिले आहेत की, खेळाडू कितीही मोठा असला तरी मैदानावरील वर्तणुकीशी तडजोड केली जाणार नाही. एका 15 वर्षांच्या नवोदित खेळाडूला अशा प्रकारे डिवचणे क्रिकेटच्या भावनेला धरून नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जेमिसनला सध्या फक्त ताकीद म्हणून डिमेरिट पॉईंट दिला गेला असला, तरी भविष्यात अशा चुकांची पुनरावृत्ती झाल्यास त्याच्यावर बंदी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.