Asian Games 2026: आशियाई क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा; संघात एका 17 वर्षीय खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

आता जपानमधील या मैदानात सुवर्णपदकावर आपले नाव कोरण्याच्या निर्धाराने हरमनप्रीतची ब्रिगेड मैदानात उतरेल.

Asian Games 2026: आशियाई क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा; संघात एका 17 वर्षीय खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

Asian Games 2026 : जपानमध्ये पुढील महिन्यात आयोजित होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी अनुभवी आणि युवा खेळाडूंचा सुरेख मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. जाहीर झालेल्या संघात हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपदाची धुरा कायम असून स्मृती मानधना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल. मात्र, हा संघ समोर आल्यानंतर क्रिकेट वर्तुळात एका अनपेक्षित नावावर सर्वांच्या नजरा खिळल्या असून त्याचीच सर्वाधिक चर्चा पाहायला मिळत आहे.

खराब फॉर्ममुळे यास्तिका बाहेर, 17 वर्षीय जी. कमलिनीला मोठी संधी
या संघ निवडीतील सर्वात मोठा निर्णय म्हणजे यष्टिरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाला दाखवलेला बाहेरचा रस्ता. विश्वचषकातील 4 सामन्यांपैकी 3 डावांत मिळून तिला केवळ 41 धावा करता आल्या होत्या. तिचा 13.66 चा सरासरी दर आणि 117.14 चा स्ट्राइक रेट अत्यंत निराशाजनक राहिल्याने निवडकर्त्यांनी तिच्यावर कठोर कारवाई केली. तिच्या जागी महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून दमदार खेळ करणाऱ्या अवघ्या 17 वर्षांच्या जी. कमलिनीला प्रथमच भारतीय संघात संधी मिळाली आहे. तिच्या या अचानक झालेल्या निवडीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

श्रेयंका पाटीलचे संघात पुनरागमन, फिरकीची धुरा तिच्यावर
घोट्याच्या दुखापतीमुळे मागील टी-20 विश्वचषक स्पर्धा अर्धवट सोडावी लागलेली अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात परतली आहे. फिटनेस चाचणीत यश मिळाल्यानंतर तिने संघात पुनरागमन केले आहे, तर दुसरीकडे मागील संघात समाविष्ट असलेल्या प्रेमा रावतला मात्र आपले स्थान गमवावे लागले आहे. या संघात शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा – IND vs ENG : संजू सॅमसनचा पत्ता कट? इंग्लंडविरुद्ध 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी करणार पदार्पण; अशी असेल भारताची प्लेईंग 11

भारताच्या गोलंदाजी आक्रमणाची रणनीती समजून घ्यायची झाल्यास वेगवान गोलंदाजीची मुख्य जबाबदारी रेणुका ठाकूर आणि अरुंधती रेड्डी यांच्या खांद्यावर असेल. फिरकी गोलंदाजीचा विभाग राधा यादव आणि श्रेयंका पाटील सांभाळतील.

थेट बाद फेरीत प्रवेशाची शक्यता; पाकिस्तान आणि श्रीलंकेचे मुख्य आव्हान
आशियाई खेळांमधील सर्व सामने टी-20 स्वरूपात खेळवले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) क्रमवारीत भारतीय संघ सध्या अव्वल स्थानावर असल्याने त्यांना या स्पर्धेत थेट बाद फेरीत (नॉकाऊट) प्रवेश मिळण्याची दाट शक्यता आहे. या स्पर्धेत भारताला प्रामुख्याने पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या आशियाई संघांकडून तगडे आव्हान मिळू शकते. जपानमधील या मैदानात सुवर्णपदकावर आपले नाव कोरण्याच्या निर्धाराने हरमनप्रीतची ब्रिगेड मैदानात उतरेल.

आशियाई खेळांसाठी निवडण्यात आलेला संपूर्ण संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनी (यष्टिरक्षक), भारती फुलमाली, श्री चरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, राधा यादव, नंदिनी शर्मा

हेही वाचा – IND vs IRE 2nd T20 : अय्यरच्या नेतृत्वावर पहिल्याच मालिकेत पराभवाचा शिक्का! दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाची सर्वात मोठी हाराकिरी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number