5G Internet Usage: भारतीय वापरकर्ते दरमहा उडवतायत ‘इतका’ GB डेटा; 5G वापरामध्ये भारत जगात दुसऱ्या स्थानावर

इंटरनेट वापराच्या बदलत्या सवयी आणि हाय-स्पीड 5G सेवेची उपलब्धता यामुळे भारत आता 5G डेटा वापराच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे.<br/>

5G Internet Usage: भारतीय वापरकर्ते दरमहा उडवतायत ‘इतका’ GB डेटा; 5G वापरामध्ये भारत जगात दुसऱ्या स्थानावर

5G Internet Usage: भारतामध्ये मोबाईल डेटा वापरण्याच्या प्रमाणात अफाट वाढ झाली असून, देशाने जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. नोकियाच्या 'MBiT 2026' अहवालानुसार, 2025 मध्ये भारतातील प्रत्येक वापरकर्त्याचा सरासरी मासिक डेटा वापर 31 GB च्या पुढे गेला आहे. 2024 मध्ये हे प्रमाण 27.5 GB इतके होते. इंटरनेट वापराच्या बदलत्या सवयी आणि हाय-स्पीड 5G सेवेची उपलब्धता यामुळे भारत आता 5G डेटा वापराच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे.

5G ट्रॅफिकमध्ये 70 टक्क्यांची प्रचंड वाढ
2025 या वर्षात 5G डेटा ट्रॅफिकमध्ये वार्षिक आधारावर तब्बल 70 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण मोबाईल ब्रॉडबँड ट्रॅफिकमध्ये 5G चा वाटा आता 47 टक्के इतका झाला आहे. गेल्या 5 वर्षांचा आढावा घेतल्यास, प्रति वापरकर्ता डेटा वापरामध्ये दरवर्षी सरासरी 18 टक्के वाढ झाली आहे. प्रामुख्याने AI-आधारित ॲप्लिकेशन्स, 4K व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि क्लाउड गेमिंग यांसारख्या सेवांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डेटाचा वापर सातत्याने वाढत आहे.

फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस (FWA) ठरला गेमचेंजर
भारताची डिजिटल परिसंस्था (Ecosystem) वेगाने विस्तारत असून, 2025 मध्ये देशाच्या एकूण डेटा ट्रॅफिकने दरमहा 27 एक्झाबाईट्सचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये 'फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस' (FWA) तंत्रज्ञानाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 5G डेटा वापरामध्ये FWA का वाटा आता 25 टक्क्यांहून अधिक झाला असून, या क्षेत्रातील वापरकर्त्यांची संख्या दरवर्षी दुप्पट वेगाने वाढत आहे. महानगरांमध्ये 5G चा विस्तार सर्वाधिक असून, तेथील एकूण डेटा ट्रॅफिकमध्ये 5G चा वाटा 58 टक्के आहे.

हेही वाचा – PNG Gas Pipeline: इंधन संकटात मोठा दिलासा! राज्यात आता तात्काळ मिळणार पाइपलाइनला मंजुरी

परवडणारे 5G स्मार्टफोन्स आणि उपकरणांची उपलब्धता
डेटा वापर वाढण्यामागे स्वस्त 5G स्मार्टफोन्सची उपलब्धता हे एक प्रमुख कारण आहे. 100 डॉलर्सपेक्षा कमी किंमत असलेल्या 5G फोन्सच्या विक्रीत वर्षभरात दहा पटीने वाढ झाली आहे. 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात सुमारे 892 दशलक्ष सक्रिय 4G उपकरणे होती, ज्यापैकी 383 दशलक्ष उपकरणांमध्ये 5G सपोर्ट उपलब्ध होता. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात बाजारात आलेल्या एकूण स्मार्टफोन्सपैकी 90 टक्के फोन 5G सक्षम होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number