India vs Zimbabwe 3rd T20: हरारेत भारतीय संघाचा डंका! 35 धावांनी विजय मिळवत झिम्बाब्वेला लोळवलं; मालिकेत ‘क्लीन स्वीप’

या ऐतिहासिक यशानंतर उत्साहात असलेल्या टीम इंडियाने हरारे येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम T20 सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 35 धावांनी पराभव केला. <br/>

India vs Zimbabwe 3rd T20: हरारेत भारतीय संघाचा डंका! 35 धावांनी विजय मिळवत झिम्बाब्वेला लोळवलं; मालिकेत ‘क्लीन स्वीप’

India vs Zimbabwe 3rd T20: आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमधील पराभवांमुळे T20 क्रमवारीतील आपले 4 वर्षांचे अव्वल स्थान गमावलेल्या भारतीय संघाने पुन्हा एकदा या जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. या ऐतिहासिक यशानंतर उत्साहात असलेल्या टीम इंडियाने हरारे येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम T20 सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 35 धावांनी पराभव केला. 

या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या या मालिकेत 3-0 असा दणदणीत 'क्लीन स्वीप' साधला असून क्रमवारीतील आपले पहिले स्थान अधिक मजबूत केले आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 192 धावांचे आव्हान उभे केले होते, ज्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 20 षटकांत केवळ 157 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी 

या विजयाचा मुख्य सूत्रधार 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ठरला. सलामीवीर अभिषेक शर्मा केवळ 2 धावांवर बाद झाल्यानंतर वैभवने 49 चेंडूंत 81 धावांची संयमी व तुफानी खेळी साकारली. त्याला इशान किशनच्या 29 धावा आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या 27 धावांची मोलाची साथ मिळाली, तर रिंकू सिंगने अखेरच्या टप्प्यात 14 चेंडूंत 25 धावांची फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 192 वर पोहोचवली. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वेला सुरुवातीलाच धक्के बसले.

भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करताना वेगवान गोलंदाज मयंक यादवने मालिकेतील पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती करत डावाच्या पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेटला बाद केले आणि सामन्यात एकूण 3 बळी घेतले. 

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi: शतक हुकलं तरी गाजवला सामना; 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची तिसऱ्या T20 मध्ये धडाकेबाज कामगिरी

दुसरीकडे, खराब क्षेत्ररक्षण आणि इशान किशनने सोडलेल्या सोप्या झेलनंतरही, युवा गोलंदाज अशोक शर्माने मारुमानीला 'क्लीन बोल्ड' करत आपली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली. क्षेत्ररक्षणातील काही चुका वगळता भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत मालिकेवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number