Womens Asia Cup 2026: महिला आशिया कप 2026 साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा, ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी

लॉर्ड्स कसोटीत अप्रतिम शतक ठोकणाऱ्या यस्तिका भाटियाला पुन्हा एकदा या संघातून वगळण्यात आले आहे.

Womens Asia Cup 2026: महिला आशिया कप 2026 साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा, ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी

Womens Asia Cup 2026: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चालू ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस रंगणाऱ्या महिला आशिया कप 2026 या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games) निवडण्यात आलेल्या बहुतांश खेळाडूंवरच निवड समितीने या स्पर्धेतही विश्वास दर्शवला आहे. तथापि, लॉर्ड्स कसोटीत अप्रतिम शतक ठोकणाऱ्या यस्तिका भाटियाला पुन्हा एकदा या संघातून वगळण्यात आले आहे. तिच्याऐवजी 18 वर्षीय युवा यष्टिरक्षक जी. कामलिनी हिला संघात स्थान देऊन निवडकर्त्यांनी नव्या दमाच्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे.

श्रेयंका पाटील बाहेर; प्रेमा रावतला मिळाली पुन्हा संधी
संघात एकमेव प्रमुख बदल करण्यात आला असून दुखापतीमुळे स्टार खेळाडू श्रेयंका पाटीलला संघातून बाहेर राहावे लागले आहे. घोट्याच्या दुखापतीतून ती अद्याप पूर्णपणे सावरू शकलेली नाही. टी-20 विश्वचषकादरम्यान याच दुखापतीमुळे तिला मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्यावेळी तिची जागा लेग-स्पिन अष्टपैलू प्रेमा रावत हिने घेतली होती आणि निवडकर्त्यांनी आशिया कपसाठीही प्रेमा रावतवरच पुन्हा विश्वास दाखवला आहे. 24 वर्षीय प्रेमा रावतला विश्वचषकात केवळ 1 सामना खेळण्याची संधी मिळाली होती, ज्यामध्ये तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 चेंडूंत नाबाद 3 धावा केल्या होत्या आणि 2 षटकांत 21 धावा दिल्याचे नोंदीत आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक आणि खेळाडूंची व्यस्तता
आशिया कपचे अंतिम वेळापत्रक अजून समोर आले नसले तरी ही स्पर्धा ऑगस्टच्या अखेरीपासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत आयोजित केली जाण्याची दाट शक्यता आहे. या स्पर्धेनंतर लगेचच 17 ते 22 सप्टेंबर दरम्यान जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. सध्या भारतीय संघातील उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष या 4 प्रमुख खेळाडू इंग्लंडमधील 'द हंड्रेड' या प्रसिद्ध लीगमध्ये खेळण्यात व्यस्त आहेत.

हेही वाचा – India vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका; स्टार गोलंदाज कसोटी मालिकेतून बाहेर

आशिया कप 2026 साठी घोषित भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, भारती फुलमाली, रिचा घोष (यष्टिरक्षक), जी. कामलिनी (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्रकार, अमनजोत कौर. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number