India Zimbabwe: गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत कोण सांभाळणार जबाबदारी; हेड कोचशिवाय भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना

झिम्बाम्वे दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संघासोबत गेलेले नाहीत, कारण ते सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेसाठी तेथेच थांबले आहेत.

India Zimbabwe: गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत कोण सांभाळणार जबाबदारी; हेड कोचशिवाय भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना

India vs zimbabwe match schedule : झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ रवाना झाला असून बीसीसीआयने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, या दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संघासोबत गेलेले नाहीत, कारण ते सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेसाठी तेथेच थांबले आहेत. गंभीर यांच्या अनुपस्थितीत भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याच्यांकडे तात्पुरती मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. लक्ष्मण यांनी यापूर्वीही इंडिया 'ए' संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम पाहिले असल्यामुळे त्याचा अनुभव युवा खेळाडूंसाठी मोलाचा ठरणार आहे.

विश्वविजयानंतर सलग पराभवांची मालिका; नव्या कर्णधारासमोर मोठे आव्हान
टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावल्यापासून भारतीय संघाला या फॉरमॅटमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. नुकत्याच पार पडलेल्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारताची कामगिरी अत्यंत खराब झाली असून संघात मोठी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघाला 2-0 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघाचा 4-0 असा दारूण पराभव झाला. श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असले, तरी त्याला अद्याप आपला पहिला विजय नोंदवता आलेला नाही.

हेही वाचा – Japan Open Super 750: 2 वर्षांचा दुष्काळ संपला! अकाने यामागुचीला धूळ चारीत सिंधू बनली जपान ओपनची 'क्वीन'

हरारे येथे होणाऱ्या 3 सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील ही 3 सामन्यांची टी-20 मालिका पूर्णपणे हरारे येथील मैदानावर खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 23 जुलैपासून सुरू होईल. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 25 जुलै रोजी आणि तिसरा तसेच अंतिम सामना 26 जुलै रोजी खेळवला जाईल. इंग्लंड दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवा वैभव सूर्यवंशीला तिथे फारशी चमक दाखवता आली नव्हती, जिथे त्याने 3 सामन्यांमध्ये अनुक्रमे 13, 14 आणि 15 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता या झिम्बाब्वे दौऱ्यात स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी त्याच्याकडे असेल.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडलेला 15 सदस्यांचा भारतीय संघ
या दौऱ्यासाठी निवड समितीने युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधत खालीलप्रमाणे संघ जाहीर केला आहे:
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, इशान किशन, शिवम दुबे, सुर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, रवी बिष्णोई, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग.

हेही वाचा – BCCI on Rohit Sharma Retirement: 2027 विश्वचषकापूर्वी रोहित शर्माला संघातून वगळणार? BCCI ने दिलं स्पष्टीकरण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number