IND vs PAK Hong Kong Sixes: हाँगकाँग सिक्सच्या 2025 च्या हंगामाची सुरुवात धमाकेदार झाली असून आज मिशन रोड मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले आहेत. पूल ‘सी’ गटातील या रोमांचक सामन्याची नाणेफेक पाकिस्तानच्या कर्णधार अब्बास आफ्रिदीने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ आता फलंदाजीसाठी उतरणार आहे.
या जलदगती फॉरमॅटमध्ये प्रत्येक संघाला केवळ सहा षटकांची संधी आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच दोन्ही संघ आक्रमक खेळ मांडतील अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानने याआधीच कुवेतविरुद्धच्या सामन्यात चार गडी राखून विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे.
हेही वाचा – IND vs AUS 4th T20I : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; मालिकेत 2-1 ने आघाडीवर
भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक करत आहेत. त्यांच्यासोबत संघात रॉबिन उथप्पा, स्टुअर्ट बिन्नी, अभिमन्यू मिथुन, भरत चिपली आणि शाहबाज नदीम हे खेळाडू आहेत. उथप्पा आणि चिपली यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली आहे आणि दोघेही संघाला जलदगती सुरुवात देण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा – T20 World Cup 2026: टी20 विश्वचषकासाठी मोठी घोषणा! 'या' शहरात रंगणार अंतिम सामना
दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ अब्बास आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली उतरला आहे. संघात ख्वाजा नाफे (यष्टीरक्षक), अब्दुल समद, माझ सदाकत, शाहिद अझीझ आणि मोहम्मद शहजाद हे प्रमुख खेळाडू आहेत. या सामन्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेटमधील जुनी प्रतिस्पर्धा पुन्हा एकदा उफाळून आली आहे. मर्यादित षटकांच्या या वेगवान फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांचे खेळाडू आपल्या जोरदार फटकेबाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाने चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.