IND vs NZ Match Time: आज क्रिकेट जगाचे लक्ष अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमकडे लागले आहे, जिथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना रंगणार आहे. महिनाभर चाललेल्या या स्पर्धेत 20 संघांपैकी सरस ठरलेले हे दोन संघ आता ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली असून, आज कोणता संघ विश्वविजेता ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ही अचूक वेळ लक्षात ठेवा
हा ऐतिहासिक सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल. भारतीय संघाने या स्पर्धेतील आपले सर्व सामने याच वेळेत खेळले आहेत. सामन्याची नाणेफेक (Toss) अर्धा तास आधी, म्हणजेच संध्याकाळी 6:30 वाजता होईल, ज्यावेळी अंतिम प्लेइंग इलेव्हन आणि रणनीती स्पष्ट होईल. जर सामना पूर्ण 40 षटकांचा झाला, तर रात्री 10:30 च्या सुमारास निकाल अपेक्षित आहे, ज्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडेल.
कुठे पाहता येईल थेट प्रक्षेपण?
टीव्हीवर: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) वर वेगवेगळ्या भाषांमधील समालोचनासह सामना उपलब्ध असेल. डीडी फ्री डिश वापरकर्त्यांसाठी डीडी स्पोर्ट्सवरही थेट प्रक्षेपण पाहता येईल.
मोबाईल आणि स्मार्ट टीव्ही: जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाईल.
दोन्ही संघांचे 'शूरवीर': संभाव्य खेळाडू
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव.
न्यूझीलंड संघ: मिशेल सँटनर (कर्णधार), टिम सेफर्ट, फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी.