India vs South Africa 3rd ODI: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज अंतिम लढत! कोहली-रोहित नवे विक्रम गाठणार?

सध्या एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने आजचा मुकाबला दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

India vs South Africa 3rd ODI: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज अंतिम लढत! कोहली-रोहित नवे विक्रम गाठणार?

India vs South Africa 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना आज विशाखापट्टणम येथील व्हीडीसीए स्टेडियमवर रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेने याआधी कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करत जोरदार सुरुवात केली होती. सध्या एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने आजचा मुकाबला दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. भारताच्या बाजूने सर्वात मोठा आत्मविश्वास निर्माण करणारा घटक म्हणजे विराट कोहलीचा सलग प्रभावी खेळ. या अनुभवी फलंदाजाने मागील दोन सामन्यांमध्ये सलग दोन शतके ठोकत आपल्या फॉर्मची जोरदार नोंद करून दिली आहे. निर्णायक लढतीत तो आणखी काही ऐतिहासिक विक्रमांच्या जवळ पोहोचू शकतो.

किंग कोहलीसमोर दोन मोठे विक्रम

आजच्या सामन्यात कोहलीने पुन्हा शतक झळकावले, तर तो दोन मोठ्या टप्प्यांवर आपले नाव कोरणार आहे. सलग तीन एकदिवसीय शतके दोनदा झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याची संधी त्याला आहे. कोहली आणि रोहित या दोघांनीही एकदा हा पराक्रम केला आहे, परंतु त्याची पुनरावृत्ती अद्याप झाली नाही. तसेच, कोहलीने आज सेंच्युरी ठोकली तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग चार एकदिवसीय शतकांचा विक्रम त्याच्या नावे होईल. याआधी रांची, रायपूर आणि 2023 विश्वचषकातही त्याने आफ्रिकेविरुद्ध शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – Virat Kolhi: IND vs SA: तिसऱ्या वनडेत कोहली ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर; आतापर्यंत फक्त दोनच खेळाडूंच्या नावावर हा विक्रम

रोहित–कोहली जोडीचाही ऐतिहासिक विक्रम शक्य

विराटच्या वैयक्तिक टप्प्यांसोबत त्याची आणि रोहित शर्माची जोडीदेखील एका खास विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. दोघांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 20 शतकी भागीदारी केली असून ते सध्या दिलशान–संगकारा यांच्या जोडीसोबत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. जर आज या जोडीने पुन्हा 100 हून अधिक धावांची भागीदारी केली, तर ते स्वतंत्रपणे दुसऱ्या क्रमांकावर जातील. मात्र सचिन तेंडुलकर–सौरव गांगुली यांची 26 शतकी भागीदारी अजूनही सर्वात वर आहे.

हेही वाचा – Smriti Mandhana : लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृति मानधनाची पहिली पोस्ट, पुन्हा एकदा चर्चांना उधाण

कर्णधार रोहित शर्माही रेकॉर्डच्या उंबरठ्यावर

विराटप्रमाणेच कर्णधार रोहित शर्मा देखील एक महत्त्वाचा मैलाचा दगड गाठण्यास सज्ज आहे. रोहितला जॅक कॅलिसला मागे टाकून वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानी पोहोचण्यासाठी फक्त 120 धावांची आवश्यकता आहे.

आजचा सामना ठरणार निर्णायक आणि ऐतिहासिक

दरम्यान, आज मालिका कोण जिंकेल हे ठरण्याबरोबरच, किंग कोहली आणि हिटमॅन रोहित शर्माचे बॅटमधून आज किती विक्रम समोर येतात, हे पाहणेही तितकेच रोमांचक ठरणार आहे. विशाखापट्टणममध्ये आज क्रिकेटप्रेमींना एक थरारक लढत पाहायला मिळणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number