Commonwealth Games 2026: ग्लास्गोमध्ये भारताचा डंका; एकाच व्यासपीठावर नीरज आणि यशवीरने फडकवला तिरंगा, भारताच्या आणखी 2 पदकाची भर

भारताचा स्टार ॲथलीट आणि ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा याने रौप्य पदकावर आपले नाव कोरले, तर पदार्पण करणाऱ्या 24 वर्षीय यशवीर सिंगने कांस्यपदकाची कमाई केली.

Commonwealth Games 2026: ग्लास्गोमध्ये भारताचा डंका; एकाच व्यासपीठावर नीरज आणि यशवीरने फडकवला तिरंगा, भारताच्या आणखी 2 पदकाची भर

Commonwealth Games 2026:  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या भालाफेकपटूंनी चमकदार कामगिरी करत देशाच्या पदकतालीकात 2 पदकांची भर घातली आहे. भारताचा स्टार ॲथलीट आणि ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा याने रौप्य पदकावर आपले नाव कोरले, तर पदार्पण करणाऱ्या 24 वर्षीय यशवीर सिंगने कांस्यपदकाची कमाई केली. वैयक्तिक पदकापेक्षाही एकाच व्यासपीठावर आपल्यासोबत दुसरा भारतीय खेळाडू उभा राहिल्याचा विशेष आनंद नीरज चोप्राच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

प्रतिकूल हवामानात नीरजची मोसमातील सर्वोत्तम कामगिरी
चालू हंगामातील केवळ दुसऱ्याच स्पर्धेत उतरलेल्या नीरज चोप्राने प्रतिकूल वातावरणाचा सामना करत 85.83 मीटर भाला फेकून रौप्य पदक निश्चित केले. ही त्याची या मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. या स्पर्धेत श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागेने 89.75 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले. 2018 च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या नीरजच्या खात्यात आता राष्ट्रकुलचे रौप्य पदकही जमा झाले आहे.

पदार्पणातच यशवीर सिंगची जबरदस्त फेक आणि कांस्य
या स्पर्धेत 24 वर्षीय यशवीर सिंग भारतासाठी ‘सरप्राइज पॅकेज’ ठरला. राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या यशवीरने अंतिम 6 व्या प्रयत्नात 85.41 मीटर भाला फेकत स्वतःची कारकीर्दीतील सर्वोत्तम (Personal Best) कामगिरी नोंदवली आणि कांस्यपदकाला गवसणी घातली. ऐन मोक्याच्या वेळी दबावाचा सामना करत यशवीरने दाखवलेल्या या धैर्याचे नीरजने मनापासून कौतुक केले.

‘आशियाई खेळांची आठवण झाली’ – नीरज चोप्रा
पोडियमवर एकत्र उभे राहण्याबाबत बोलताना नीरज म्हणाला, “यशवीरसोबत व्यासपीठावर असणे अतिशय खास होते. यामुळे मला आशियाई क्रीडा स्पर्धेची आठवण झाली, जिथे मी आणि किशोर जेना यांनी दुहेरी पदक जिंकले होते. अशा मोठ्या मंचावर यशवीरने वैयक्तिक सर्वोत्कृष्ट फेक करणे कौतुकास्पद आहे. माझीही या मोसमातील कामगिरी सुधारत असून पुनरागमन चांगले होत आहे.”

हेही वाचा – Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अस्मिता डे ची सुवर्ण भरारी; ज्युदोमध्ये पदक पक्कं करत रचला इतिहास

नीरजच्या ऐतिहासिक पदक संग्रहात आणखी एका पदकाची भर
या रौप्य पदकामुळे नीरज चोप्राच्या आधीच अफाट असलेल्या पदक संग्रहाची शोभा आणखी वाढली आहे. त्याच्या नावावर आता ऑलिम्पिक (सुवर्ण व रौप्य), जागतिक चॅम्पियनशिप (सुवर्ण व रौप्य), आशियाई खेळ (2 सुवर्ण), राष्ट्रकुल खेळ (सुवर्ण व रौप्य), डायमंड लीग करंडक, आशियाई चॅम्पियनशिप आणि अंडर-20 जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकांचा समावेश आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number