World Boxing Cup Finals : वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये भारतावर सुवर्णपदकांचा वर्षाव!; चार महिला बॉक्सर्सची ऐतिहासिक कामगिरी

मिनाक्षी (48 किलो गटात), प्रीती (54 किलो), अरुंधती चौधरी (70 किलो) आणि नुपूर (80 किलो) यांनी शानदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदकांची कमाई केली.

World Boxing Cup Finals : वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये भारतावर सुवर्णपदकांचा वर्षाव!; चार महिला बॉक्सर्सची ऐतिहासिक कामगिरी

World Boxing Cup Finals: वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्समध्ये भारतीय महिला बॉक्सर्सनी इतिहास रचला आहे. मिनाक्षी (48 किलो गटात), प्रीती (54 किलो), अरुंधती चौधरी (70 किलो) आणि नुपूर (80 किलो) यांनी शानदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदकांची कमाई केली. शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या चारही महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ही सुवर्णपदके 2028 लॉस एंजेलिस ऑलिंपिकमधील मुख्य वजन गटांमध्ये आली आहेत, जिथे बॉक्सिंगमध्ये पूर्ण लिंगसमानता लागू होणार आहे. त्यामुळे हा विजय भारतासाठी ऑलिंपिकपूर्व मोठा आत्मविश्वास वाढवणारा मानला जात आहे.

महिला बॉक्सर्सची दमदार कामगिरी 

सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत मिनाक्षीने आशियाई विजेती फरझोना फोझिलोवा हिला 5-0 ने धुळ चारली. स्पीड, अचूकता आणि हवाई बचाव तिच्या विजयाचे गमक ठरले. तथापी, इटलीच्या जागतिक पदक विजेत्या सिरीन चाराबीवर प्रीतीने प्रचंड दबाव आणत 5-0 असा एकमताने विजय मिळवला. तसेच 18 महिन्यांनंतर रिंगमध्ये परतलेल्या अरुंधतीने उझबेकिस्तानच्या अझीझा झोकिरावा हिला नेमकी जॅब्स आणि काउंटर पंचेसच्या जोरावर 5-0 ने हरवले.

हेही वाचा – Sourav Ganguly: सौरव गांगुलीने गौतम गंभीरला सुनावलं म्हणाला; 'कोणताही निर्णय घेण्याआधी…'

नुपूरचा रोमांचक विजय 

नुपूरने उझबेकिस्तानच्या ओल्टिनॉय सोटिम्बोएवा विरुद्ध कडवा सामना जिंकत भारतासाठी चौथे सुवर्णपदक निश्चित केले.

हेही वाचा – Shikhar Dhawan Cheating Case: शिखर धवनच्या नावावर लाखोंचा गैरव्यवहार; मॅनेजमेंट कंपनीच्या CEO वर गंभीर आरोप

पुरुषांकडूनही दमदार कामगिरी 

भारतीय पुरुष बॉक्सर्सनेही दमदार प्रदर्शन करत 4 रौप्यपदके पटकावली. जादुमणी सिंग (50 किलो) ने शौर्याने झुंज दिली. पण त्याला उझबेकिस्तानच्या असिलबेक जालिलोव्हकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला. तसेच पवन बर्टवाल (55 किलो) समंदर ओलिमोव्हकडून पराभूत झाला. तथापी, अभिनाश जामवाल (65 किलो) ने जोरदार लढत दिली पण त्याला जपानच्या अनुभवी शिओन निशियामाकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला, तर अंकुश फांगल (80 किलो) इंग्लंडच्या गतविजेत्या शिट्टू ओलादिमेजीकडून पराभूत झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number