Commonwealth Games 2026: कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा दबदबा! नीरज चोप्रासह तीन भारतीय अंमित फेरीत; कधी होणार मेडलसाठी महामुकाबला?

दीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुरुषांच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

Commonwealth Games 2026: कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा दबदबा! नीरज चोप्रासह तीन भारतीय अंमित फेरीत; कधी होणार मेडलसाठी महामुकाबला?

Glasgow Commonwealth Games 2026: कॉमनवेल्थ गेम्समधील भालाफेक (Javelin Throw) स्पर्धेतून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. दीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुरुषांच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, या पात्रता फेरीत नीरजने पाकिस्तानच्या ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीमपेक्षाही जास्त अंतरावर भाला फेकत त्याला मागे टाकले. केवळ नीरजच नाही, तर भारताच्या तिन्ही खेळाडूंनी शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.

हवामानाच्या आव्हानावर मात करत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक
ग्लासगो येथील प्रतिकूल आणि थंड हवामानात झालेल्या पात्रता फेरीत नीरज चोप्राने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो नोंदवला. वातावरणातील तीव्र थंडीमुळे एकाही खेळाडूला 84.00 मीटरचा 'ऑटोमॅटिक क्वालिफिकेशन'चा टप्पा पार करता आला नाही. परिणामी, दोन्ही गटांमधील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे नीरजने 5 वे स्थान मिळवून 12 खेळाडूंच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

भारताचे तिन्ही भालाफेकपटू अंतिम फेरीत; पदकाची आशा उंचावली
या स्पर्धेत भारताच्या तिन्ही भालाफेकपटूंनी चमकदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. रोहित यादवने 78.37 मीटरच्या थ्रोसह 9 वे स्थान मिळवले, तर यश वीर सिंगने 78.36 मीटरच्या कामगिरीसह 10 व्या स्थानावर राहून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. एकाच वेळी ३ भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे भारताच्या पदक जिंकण्याच्या शक्यता कमालीच्या वाढल्या आहेत.

श्रीलंकेचा रुमेश थरंगा अव्वल; अर्शद नदीम 7 व्या क्रमांकावर
पात्रता फेरीत श्रीलंकेच्या रुमेश थरंगाने 82.84 मीटर भाला फेकून अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिल्या प्रयत्नानंतर कामगिरीत सुधारणा करू शकला नाही, तरीही 78.63 मीटरच्या थ्रोसह 7 व्या स्थानावर राहत तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

हेही वाचा – Ajinkya Rahane Retirement : "हीच ती योग्य वेळ…" अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; व्हिडीओ शेअर करत 12 वर्षांचा प्रवास संपवला

भालाफेक पात्रता फेरीचा अंतिम निकाल

1. रुमेश पाथिरागे (SRI) – 82.84 मीटर
2. अँडरसन पीटर्स (GRE) – 81.29 मीटर
3. डाऊ स्मिथ (RSA) – 80.64 मीटर
4. बेन ईस्ट (ENG) – 80.38 मीटर
5. नीरज चोप्रा (IND) – 79.61 मीटर
6. कॅमेरॉन मॅकइंटायर (AUS) – 78.91 मीटर
7. अरशद नदीम (PAK) – 78.63 मीटर
8. कीशॉन स्ट्रॅचन (BAH) – 78.60 मीटर
9. रोहित यादव (IND) – 78.37 मीटर
10. यश वीर सिंग (IND) – 78.36 मीटर
11. केशॉर्न वॉलकॉट (TTO) – 78.26 मीटर
12. चिनेचेरेम न्नामदी (NIG) – 75.27 मीटर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number