India vs Pakistan Match: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; ‘आशियन लेजेंड्स लीग 2026’ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार सामना

'आशियन लेजेंड्स लीग' (ALL) च्या दुसऱ्या सीझनचे अधिकृत वेळापत्रक समोर आले असून, चाहत्यांना पुन्हा एकदा या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील थरार अनुभवता येणार आहे.

India vs Pakistan Match: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; ‘आशियन लेजेंड्स लीग 2026’ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार सामना

India vs Pakistan Match: आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच आता निवृत्त खेळाडूंच्या लीगमध्येही भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येताना दिसणार आहेत. 'आशियन लेजेंड्स लीग' (ALL) च्या दुसऱ्या सीझनचे अधिकृत वेळापत्रक समोर आले असून, चाहत्यांना पुन्हा एकदा या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील थरार अनुभवता येणार आहे. माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेली ही लीग चाहत्यांच्या उत्सुकतेला उधाण आणणारी ठरणार आहे.

30 जुलैपासून स्पर्धेचा बिगुल वाजणार; 6 दिग्गज संघ आमनेसामने
झांबियातील लुसाका शहरात 30 जुलैपासून ALL 2026 या स्पर्धेला सुरुवात होत आहे. या हंगामात एकूण 6 संघ जेतेपदासाठी लढणार असून यात इंडियन रॉयल्स, आशियन स्टार्स, श्रीलंकन लायन्स, बांगलादेश टायगर्स, अफगाणिस्तान पठाण्स आणि पाकिस्तान पँथर्स यांचा समावेश आहे. एकूण 15 सामने खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील नॉकआउट फेरी आयपीएल (IPL) च्या फॉरमॅटनुसार आयोजित केली जाईल.

2 ऑगस्टला हाय-व्होल्टेज सामना; लोटस स्पोर्ट्स क्लबवर होणार भिडंत
स्पर्धेतील सर्वात मोठा आणि बहुप्रतीक्षित भारत-पाकिस्तान सामना 2 ऑगस्ट 2026 रोजी रंगणार आहे. लुसाका येथील लोटस स्पोर्ट्स क्लबवर 'इंडियन रॉयल्स' आणि 'पाकिस्तान पँथर्स' हे दोन दिग्गज संघ आमनेसामने येतील. भारतीय वेळेनुसार दुपारी 4:00 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

हेही वाचा – FIFA World Champions 2026 : मेस्सीचं स्वप्न भंगलं! स्पेनने 16 वर्षांनंतर जिंकला फिफा विश्वचषक; अर्जेंटिनावर 1-0 ने मात

मैदानावर दिसणार स्टार खेळाडूंची फौज
'इंडियन रॉयल्स' संघाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व शिखर धवन, सुरेश रैना, युसूफ पठाण, हरभजन सिंग, अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक यांसारखे स्टार खेळाडू करतील. तर दुसऱ्या बाजूला 'पाकिस्तान पँथर्स' कडून मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, सईद अजमल आणि सोहेल तन्वीर यांसारखे अनुभवी खेळाडू मैदानात उतरतील. या दोन्ही संघांतील दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणे क्रिकेटप्रेमींसाठी खास पर्वणी असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number