IND vs SA Test : डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर ‘यशस्वी’ कधी होणार? क्रिकेटप्रेमींना जयस्वालच्या फॉर्मची चिंता

यशस्वी जयस्वालला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना सातत्याने अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. क्रिकेटप्रेमी त्याच्या मोठ्या खेळीकडे डोळे लावून बसले आहेत.

IND vs SA Test : डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर ‘यशस्वी’ कधी होणार? क्रिकेटप्रेमींना जयस्वालच्या फॉर्मची चिंता

IND vs SA Test : गुवाहाटीतील कसोटी (Guwahati Test Match) सामन्यात भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा धैर्याने सामना करावा, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना होती. कारण भारतासमोर विजयासाठी 550 धावांचे मोठे आव्हान आहे. मात्र, या कसोटीत भारतीय युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) दुसऱ्या डावातही आपल्या त्याच चुकांमधून बाहेर पडू शकत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीतील कमकुवत बाजू पुन्हा एकदा दिसून आली आहे.

डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्धचा संघर्ष
यशस्वी जयस्वालला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा (Left Arm Fast Bowler) सामना करताना सातत्याने अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. गुवाहाटी कसोटीच्या पहिल्या डावात (First Innings) यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी करून चांगली सुरुवात केली होती. पण दुसऱ्या डावात तो केवळ काही धावा करून बाद झाला. त्याने फक्त 13 धावा केल्या आणि मार्कोच्या (Marco Jansen) जाळ्यात अडकला. यानसेनच्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर (Short Ball) 'कट' मारण्याचा प्रयत्न करताना यशस्वीने विकेटकीपरकडे सोपा झेल दिला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये, जयस्वाल हा सहा वेळा लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाजांसमोर बाद झाला आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2026 Schedule: अखेर टी-20 विश्वचषक 2026 वेळापत्रक 'या' तारखेला जाहीर होणार; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

मार्को यानसेनने त्याला आतापर्यंत 3 वेळा बाद केले असून, यानसेनविरुद्ध जयस्वालची फलंदाजीची सरासरी फक्त 14 आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या एकूण सहा डावांपैकी 5 डावांमध्ये तो अपयशी ठरला आहे. यापैकी 2 डावांमध्ये तर त्याला भोपळाही फोडता आला नाही. यशस्वी जयस्वाल दक्षिण आफ्रिका आणि डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना चाचपडताना (Struggling) दिसत आहे. भविष्यात आपल्या समस्या वाढू नयेत, यासाठी त्याला लवकरच आपल्या खेळात सुधारणा करण्याची गरज आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number