Bank Closed : मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प राहणार;काय आहे कारण अन् कधी असणार बंद?

सोलापूर : सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे असतील तर ती वेळेत उरकून घेणे गरजेचे आहे. अनेक मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिलेली आहे. याच संपामुळे बँकिंग व्यवहाक हे पूर्णपणे ठप्प होणार आहे. […]

Bank Closed : मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प राहणार;काय आहे कारण अन् कधी असणार बंद?
26 सप्टेंबर आधीच बँकेची सर्व कामे पूर्ण करा

सोलापूर : सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे असतील तर ती वेळेत उरकून घेणे गरजेचे आहे. अनेक मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिलेली आहे. याच संपामुळे बँकिंग व्यवहाक हे पूर्णपणे ठप्प होणार आहे. नेमकी किती दिवस बँक बंद राहणार आहे, त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.

नेमके कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आणि 28 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने बँकांना सलग सुट्टी असेल. त्यानंतर लगेचच 28,29 आणि 30 सप्टेंबर असे तीन दिवस देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. म्हणजेच 26 सप्टेंबरनंतर थेट 1 ऑक्टोबरला बँका या सुरु होणार आहेत. त्यामुळेच नागरिकांना 26 ते 30 सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येणार नाहीत.

हेही वाचा-Local Train Accident : नियतीचा घाला! घर गाठण्याआधीच काळाने हिरावले,25 वर्षीय चित्राचा दुर्दैवी मृत्यू

या दिवसांमध्ये बँकांच्या शाखा बंद असल्याने पैसे काढणे, भरणा करणे, चेक क्लिअरन्स, कर्जासंबंधित असलेली कामे तसेच इतर महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या प्रमुख मागण्यांमध्ये पाच दिवसांचाच आठवडा लागू करणे, वेतनवाढ, पुरेसे कर्मचारी भरती करणे तसेच कामाच्या तासांबाबत सुधारणे करणे यांसारख्या मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

डिजिटल बँकिंगचा वापर करण्याचे आवाहन
गेल्या काही दिवसांपासून या मागण्यांवर तोडगा निघत नसल्यामुळे संप करावा लागत आहे. दरम्यान, बँका बंद असल्या तरी प्रत्येक ग्राहकांना फारशी अडचण येऊ नये म्हणून डिजिटल बँकिंगचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या संपांच्या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये ग्राहकांना युपीआय, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग तसेच एटीएमद्वारे व्यवहार करावे लागतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number