IND vs ENG : संजू सॅमसनचा पत्ता कट? इंग्लंडविरुद्ध 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी करणार पदार्पण; अशी असेल भारताची प्लेईंग 11

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर आता संघात मोठे फेरबदल करण्याचे संकेत मिळत आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

IND vs ENG : संजू सॅमसनचा पत्ता कट? इंग्लंडविरुद्ध 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी करणार पदार्पण; अशी असेल भारताची प्लेईंग 11

IND vs ENG 1st T20 Playing 11 : आयर्लंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला आहे. या मालिकेत भारतीय संघाला 2 पैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही आणि मालिका 2-0 अशी गमावावी लागली. या लाजिरवाण्या पराभवानंतर आता संघात मोठे फेरबदल करण्याचे संकेत मिळत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या आगामी पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल निश्चित मानले जात असून, कर्णधार श्रेयस अय्यर काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या बदलांमध्ये सर्वांचे लक्ष 15 वर्षांच्या युवा फलंदाजाकडे म्हणजेच वैभव सूर्यवंशीकडे लागले आहे.

खराब कामगिरीमुळे संजू सॅमसनला डच्चू मिळण्याची शक्यता
आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये डावाची सुरुवात करण्याची संधी मिळूनही संजू सॅमसनला पूर्णपणे अपयश आले. पहिल्या सामन्यात अवघ्या 5 धावा आणि दुसऱ्या सामन्यात तर तो पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला. पहिल्या सामन्यात संजूने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती, तर दुसऱ्या सामन्यात इशान किशनने यष्टीरक्षक म्हणून कामगिरी बजावली. संजूच्या या अत्यंत खराब फॉर्ममुळे श्रेयस अय्यर त्याला पहिल्या सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवून त्याच्या जागी युवा वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करू शकतो.

हेही वाचा – गौतम गंभीर यांची होणार हकालपट्टी? 'हा' माजी स्टार क्रिकेटपटू बनू शकतो टीम इंडियाचा हेड कोच; श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावर मोठी भविष्यवाणी

वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची सुवर्णसंधी
आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये बेंचवर बसून राहावे लागलेल्या वैभव सूर्यवंशीला बुधवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. जर वैभवला संघात स्थान मिळाले, तर तो भारतासाठी सर्वात तरुण पदार्पण करणाऱ्या खेळाडूंपैकी एक ठरेल. याशिवाय संघात सूर्यांश शेडगेला संधी द्यायची की नाही, यावरही संघ व्यवस्थापनात मोठी चर्चा रंगण्याची शक्यता आहे. आयर्लंडमधील अपयशानंतर संघात नवी ऊर्जा भरण्यासाठी हा युवा खेळाडू मैदानावर उतरण्यास सज्ज आहे.

पहिल्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी डावाची सुरुवात करू शकतात. मधल्या फळीत इशान किशन यष्टीरक्षकाची भूमिका बजावेल, तर तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्यावर फटकेबाजीची जबाबदारी असेल. याशिवाय अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतील, तर गोलंदाजीची धुरा हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि प्रिन्स यादव यांच्या खांद्यावर असेल.

हेही वाचा – IND vs IRE 2nd T20 : अय्यरच्या नेतृत्वावर पहिल्याच मालिकेत पराभवाचा शिक्का! दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाची सर्वात मोठी हाराकिरी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number