Hardik Pandya-Mahieka Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अंतिम सामना शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघ गुरुवारी अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. होमग्राऊंडवर दाखल होताच हार्दिक पंड्याचा स्वॅग पाहायला मिळाला. यावेळी हार्दिक पाड्यासोबत त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माही कॅमेऱ्यात कैद झाली. तथापी, यावेळी हार्दिक पांड्या माहिकाच्या खांद्यावर हात ठेऊन चालताना दिसला.
गिलचा सहभाग अनिश्चित, संजू सॅमसनला संधी
मागील सामन्यात सराव करताना जखमी झालेल्या गिलचा अंतिम सामन्यात खेळण्याबाबत संशय आहे. तरीही तो संघासोबत अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. गिल खेळू शकला नाही तर संजू सॅमसनला वरच्या क्रमात फलंदाजीसाठी पर्याय मानले जाऊ शकते. सॅमसनला सलामीवीर म्हणून कामगिरी चांगली आहे, परंतु मधल्या क्रमात अपेक्षेनुसार फलंदाजी करता आली नाही.
हेही वाचा – शत्रूची भूमी, मैदानंही त्यांचचं; पण पठ्ठ्यानं परिधान केली भारतीय जर्सी…, डौलानं फडकवला तिरंगा!
मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर
भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. लखनौमध्ये झालेला चौथा सामना धुक्यामुळे रद्द झाला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताला मालिका जिंकण्यासाठी चांगली संधी आहे.
#WATCH | Gujarat | The Indian Cricket Team arrives at Ahmedabad ahead of their fifth T20 match against South Africa, to be played on 19th December. India leads the five-match series by 2-1. pic.twitter.com/TeLsgqHZsY — ANI (@ANI) December 18, 2025
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत:
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका:
रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडेन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रुविस, डेव्हिड मिलर, डोनोवन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटेनले बार्टमन.