Hardik Pandya: हार्दिक पांड्या याच्यासाठी सध्या काळ फारसा अनुकूल दिसत नाही. त्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ आधीच इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर पडला असून, संघ सध्या उर्वरित लीग सामने खेळत आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात घडलेल्या एका वादग्रस्त घटनेमुळे हार्दिक पांड्यावर BCCI कडून कठोर कारवाई करण्यात आली आहे.
आचारसंहितेचे उल्लंघन; 10 टक्के मॅच फी दंड
IPL ने जारी केलेल्या निवेदनानुसार, हार्दिक पांड्याला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 10 टक्के दंड आणि 1 डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान त्याने IPL आचारसंहितेचे (स्तर-1) उल्लंघन केले. हे प्रकरण खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी लागू असलेल्या कलम 2.2 अंतर्गत येते, जे मैदानावरील उपकरणांचा गैरवापर करण्याशी संबंधित आहे.
बेल्सला धक्का दिल्याची घटना ठरली कारणीभूत
मिळालेल्या माहितीनुसार, सामन्याच्या दुसऱ्या डावातील 10 व्या षटकाच्या 4 थ्या चेंडूनंतर परत जाताना हार्दिक पांड्याने यष्टींवरील बेल्सला जोरात धक्का दिला. ही कृती अयोग्य मानून सामनाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेतली आणि त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. ही घटना मैदानावरील भावनांवर नियंत्रण न ठेवण्याचे उदाहरण म्हणून पाहिली जात आहे.
हेही वाचा – IPL 2026: राजस्थानच्या एका विजयाने चार संघांचं स्वप्न भंगणार? KKR-CSK चं भवितव्य आता मुंबईच्या हातात
सामन्यातील कामगिरीही ठरली निराशाजनक
या सामन्यात मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून केवळ 147 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने 18.5 षटकांत 6 गडी राखून लक्ष्य गाठत 4 गडी राखून विजय मिळवला. पुनरागमन करत असलेल्या हार्दिक पांड्याने 27 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या, तर गोलंदाजीत 2 षटकांत 13 धावा देऊनही त्याला कोणताही बळी मिळवता आला नाही.