Girija Oak Saree Look : मैत्रिणीची साडी नेसून गिरिजा ओक झाली फेमस; स्वतःच सांगितलं तिचं या अभिनेत्रीसोबतच खास सिक्रेट

आज ही निळी साडी गिरीजा ओकच्या फॅशनपेक्षा जास्त मैत्रीची आठवण बनली आहे. निळ्या साडीमुळे गिरीजाला एक नवी ओळख मिळाली.

Girija Oak Saree Look : मैत्रिणीची साडी नेसून गिरिजा ओक झाली फेमस; स्वतःच सांगितलं तिचं या अभिनेत्रीसोबतच खास सिक्रेट

Girija Oak and Priya Bapat : मराठमोळ्या अभिनेत्री गिरीजा ओक आणि प्रिया बापट दोघीही अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात (Marathi Entertainment) कार्यरत आहेत. गिरिजाने जाहिरात क्षेत्रात विशेष नाव कमावले; तसेच अनेक मराठी आणि गुजराती नाटकांमध्ये व सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. तिच्या कामाची पोचपावती प्रेक्षकांनी नेहमीच दिली, पण एका साध्याशा मुलाखतीत तिने नेसलेल्या एका निळ्या साडीने (Girija Oak Blue Saree Look) गिरीजाला एका रात्रीत 'नॅशनल क्रश' (National Crush) बनवले. तिचे फोटो देशभरात व्हायरल (Girija Oak Blue Saree Photos Viral) झाले आणि गिरीजाला नवी ओळख मिळाली.

प्रिया बापटच्या ब्रँडची होती ती साडी
ती निळी साडी गिरीजाची नव्हतीच, हे तुम्हाला माहिती आहे का? ही साडी तिची मैत्रीण आणि मराठी अभिनेत्री प्रिया बापटची (Priya Bapat) होती! गिरीजा ओकने (Girija Oak) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या ब्लू साडीमागचे सीक्रेट अखेर सांगितले. साडी प्रिया बापटची होती, पण फेमस झाली गिरीजा ओक. गिरिजाने नेसलेली ती निळी साडी तिच्या वैयक्तिक कलेक्शनमधील नव्हती.

साईवेंची ब्रँडची निवड
ही स्काय ब्लू रंगाची लिनन साडी (Girija Oak Sky Blue Linen Saree) अभिनेत्री प्रिया बापट आणि तिची बहीण श्वेता यांच्या साईवेंची (SaiVenchi) या ब्रँडकडून गिरीजाला मिळाली होती. गिरीजाने सांगितले की, तिला एका शूटसाठी खास साडी हवी होती. त्यावेळी तिने प्रियाला फोन करून सांगितले की, "मी साडी वापरेन आणि परत देईन, त्यावर आपण कोलॅबरेशनमध्ये पोस्टही करूया." त्यानंतर प्रियाची बहीण श्वेताने गिरीजाला अनेक साड्या पाठवल्या होत्या; त्यातून तिने ही स्काय ब्लू रंगाची साडी निवडली.

हेही वाचा – Gaurav Khanna: गौरव खन्ना झाला मालामाल! बक्षिसाच्या रकमेपेक्षा बिग बॉसची फी जास्त; आठवड्याला घ्यायचा 'इतकी' रक्कम

अनपेक्षित लोकप्रियता आणि अनोखी भेट
गिरीजाने या मुलाखतीत सांगितले, "आम्हाला वाटलंच नव्हतं की ही साडी इतकी व्हायरल होईल. मी तिच्या इतरही साड्या अनेकदा नेसल्या होत्या. पण हीच साडी लोकांच्या इतकी लक्षात राहील, असं वाटलं नव्हतं." जरी गिरीजाने ही साडी विकत घेतली नव्हती, तरी तिचे या साडीशी एक खास नाते तयार झाले. तिने श्वेताला विनंती केली की तिला ती साडी काही काळ स्वतःकडेच ठेवायची आहे. यावर श्वेताने ती साडी गिरीजाला भेट म्हणून दिली.

मैत्री आणि कामाची नवी ओळख
आज ही निळी साडी गिरीजा ओकच्या फॅशनपेक्षा जास्त मैत्रीची आठवण बनली आहे. निळ्या साडीमुळे गिरीजाला एक नवी ओळख मिळाली. नॅशनल क्रश (Girija Oak National Crush) झाल्यानंतर गिरीजा ओकने प्रतिक्रिया दिली होती की, "या निमित्तानं लोकांपर्यंत माझं काम पोहोचत असेल, लोकांनी मी नव्याने कळत असेल तर मी आनंदी आहे."

हेही वाचा – Kanika Kapoor : मेगाँग फेस्टिव्हलमध्ये गोंधळ; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कनिका कपूरच्या चाहत्यानं थेट…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number