Gautam Gambhir: गौतम गंभीर संतापला; ‘या’ प्रकरणी ठोठावला दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा

गेल्या काही दिवसांपासून 'रेड बॉल' क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवरून गंभीर यांना 'ट्रोलर्स'कडून लक्ष्य केले जात होते, मात्र आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.<br/>

Gautam Gambhir: गौतम गंभीर संतापला; ‘या’ प्रकरणी ठोठावला दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा

Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाला 2 ICC विजेतेपदे मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे विद्यमान मुख्य प्रशिक्षक (Head Coach) गौतम गंभीर यांनी आता कायदेशीर लढाई सुरू केली आहे. आपली ओळख आणि प्रतिमेचा (Personality Rights) बेकायदेशीरपणे वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून एक दिवाणी खटला दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून 'रेड बॉल' क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवरून गंभीर यांना 'ट्रोलर्स'कडून लक्ष्य केले जात होते, मात्र आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर आणि बेकायदेशीर कृत्य
गौतम गंभीर यांनी आपल्या याचिकेत अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्यामध्ये अत्याधुनिक 'क्लोनिंग तंत्रज्ञाना'चा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे गंभीर यांचा चेहरा आणि आवाज बेकायदेशीरपणे बदलून (Deepfake) दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे समोर आले आहे. आपल्या नावाचा आणि प्रतिमेचा असा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे आपली प्रतिष्ठा मलिन होत असल्याचे गंभीर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

हेही वाचा – Hockey World Cup 2026 Schedule: हॉकी विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान 'या' दिवशी भिडणार

खटल्याची पार्श्वभूमी आणि ट्रोलिंगचा तडाखा
टीम इंडियाच्या कसोटी क्रिकेटमधील काही खराब कामगिरीनंतर गौतम गंभीर हे सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरले होते. मात्र, या टीकेचे रूपांतर जेव्हा वैयक्तिक हल्ला आणि तंत्रज्ञानाच्या आधारे प्रतिमेचा गैरवापर करण्यात झाले, तेव्हा गंभीर यांनी कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या खटल्यामुळे आता अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number