Kapil Dev on Gautam Gambhir : ‘गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक नाही, तर व्यवस्थापक…’; कपिल देव यांच्या विधानाने क्रिकेट विश्वात नवा वाद

कपिल देव म्हणाले की, आधुनिक क्रिकेटमध्ये ‘प्रशिक्षक’ या शब्दाचा अर्थ बदलला आहे. आजच्या घडीला गौतम गंभीर प्रशिक्षक नाही, तर संघ व्यवस्थापक आहे.

Kapil Dev on Gautam Gambhir : ‘गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक नाही, तर व्यवस्थापक…’; कपिल देव यांच्या विधानाने क्रिकेट विश्वात नवा वाद

Gautam Gambhir Vs Kapil Dev: भारताचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-2 ने कसोटी मालिका गमावल्यानंतर गंभीर यांच्या कार्यशैलीवर टीका होत असतानाच कपिल देव यांनी थेट मत मांडले आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या आयसीसी शतकोत्तर सत्रात बोलताना कपिल देव म्हणाले की, आधुनिक क्रिकेटमध्ये ‘प्रशिक्षक’ या शब्दाचा अर्थ बदलला आहे. आजच्या घडीला गौतम गंभीर प्रशिक्षक नाही, तर संघ व्यवस्थापक आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. कपिल यांच्या मते, सध्याच्या काळात मुख्य प्रशिक्षकाची भूमिका खेळाडूंना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यापेक्षा त्यांचे व्यवस्थापन, मनोबल वाढवणे आणि संघ एकत्र ठेवण्याची आहे.

कपिल देव म्हणाले की, 'शाळा आणि महाविद्यालयात जे आम्हाला शिकवायचे ते खरे प्रशिक्षक होते. आज तुम्ही लेगस्पिनर किंवा यष्टीरक्षकाला कसे प्रशिक्षण देऊ शकता? त्यामुळे प्रशिक्षकापेक्षा व्यवस्थापकाची भूमिका अधिक महत्त्वाची आहे.' त्यांनी पुढे सांगितले की, व्यवस्थापक म्हणून खेळाडूंना आत्मविश्वास देणे गरजेचे असते, कारण तरुण खेळाडू अशा नेतृत्वावर विश्वास ठेवतात.

हेही वाचा – T20 World Cup 2026: ठरलं तर! टी-20 विश्वचषक 2026 साठी 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा

गौतम गंभीर यांच्यावर खेळाडूंमध्ये सतत बदल करणे आणि तात्पुरत्या पर्यायांवर अवलंबून राहण्याबाबत टीका होत असताना कपिल देव यांच्या या वक्तव्याने चर्चेला नवे वळण दिले आहे. नेतृत्वाची भूमिका केवळ स्वतःच्या कामगिरीपुरती मर्यादित नसून संघाला एकत्र बांधण्याची जबाबदारीही त्यात समाविष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या चर्चेदरम्यान कपिल देव यांनी फलंदाजीच्या तंत्राबाबतही मत व्यक्त केले. सुनील गावस्कर आजच्या काळात खेळले असते तर ते सर्वोत्तम टी-20 फलंदाज ठरले असते, असे त्यांनी सांगितले. 'ज्यांचा बचाव मजबूत असतो, त्यांना आक्रमक खेळ करणे सोपे जाते,' असे मतही त्यांनी मांडले.

हेही वाचा – Greg Biffle Plane Crash: क्रीडा क्षेत्रावर शोककळा! विमान अपघातात दिग्गज खेळाडूचा मृत्यू, पत्नी आणि मुलंही आगीच्या विळख्यात

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार मिताली राज यांनीही आपले अनुभव सांगितले. भारताने घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकल्यानंतर ट्रॉफीवर ‘भारत’ असे नाव पाहणे ही भावनिक आणि अविस्मरणीय अनुभूती होती, असे त्यांनी सांगितले. एकूणच, कपिल देव यांच्या विधानामुळे गौतम गंभीर यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा नेमका अर्थ काय असावा यावर क्रिकेट विश्वात नव्याने वाद निर्माण झाला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number