Arron Finch IPL Career | आतापर्यंत आयपीएलच्या 9 टीम्समधून खेळला, मात्र कामगिरी झिरो; एरॉन फिंचच्या कोणत्या संघासाठी किती धावा?

आतापर्यंत आयपीएलच्या 9 टीम्समधून खेळला, मात्र कामगिरी झिरो; एरॉन फिंचच्या कोणत्या संघासाठी किती धावा?

Arron Finch IPL Career | आतापर्यंत आयपीएलच्या 9 टीम्समधून खेळला, मात्र कामगिरी झिरो; एरॉन फिंचच्या कोणत्या संघासाठी किती धावा?

ऍरॉन फिंच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार, ज्याने त्याच्या फलंदाजीने विश्व क्रिकेटमध्ये त्याचं नाव केलं. ऑस्ट्रेलियासाठी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17 शतकं मारली, तर T20 मध्ये दोन शतकं मारली. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटच्या इतिहासात फिंच एकटाच खेळाडू आहे ज्याने दोनदा 150 पेक्षा जास्त धावा केल्या. T20मध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा फलंदाज ऍरॉन फिंच आहे. हे सर्व फिंचने साध्य केलं, पण त्याची आयपीएलची कामगिरी निराशाजनक आहे. तो 9 वेगवेगळ्या संघांसाठी खेळला. तो कोणकोणत्या संघांसाठी खेळला आणि त्या संघांसाठी किती धावा केल्या ते जाणून घेऊ. 

हेही वाचा – Riyan Parag: हातात ती गोष्ट, तोंडातून धुर…, सामन्यादरम्यान राजस्थानच्या कॅप्टन काय करत होता? आक्षेप घेत नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, आता काय कारवाई होणार?

राजस्थान रॉयल्स (आरआर): 2010
ऍरॉन फिंच 2010 मध्ये राजस्थानसाठी खेळला. मात्र, त्याला एकाच सामन्यासाठी मुख्य संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याने या सामन्यात २१ चेंडूत २१ धावा केल्या होत्या. 

दिल्ली डेअरडेव्हिल्स (डीडी): 2011-2012
राजस्थाननंतर फिंच दिल्लीसाठी खेळला. 2011-2012 या दोन हंगामात फिंच दिल्लीसाठी खेळला होता. दोन्ही हंगामात मिळून 8 सामन्यात खेळण्याची संधी त्याला मिळाली. या आठ सामन्यात त्याने 102 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 30 होती. 

पुणे वॉरियर्स इंडिया (PWI): 2013
दिल्ली डेअरडेव्हिल्स नंतर फिंच पुणे वॉरियर्स इंडियाकडे वळाला. तो पुण्यासाठी 16 पैकी 14 सामन्यात त्याला पुण्याचं नेतृत्व करण्याची संधीदेखील मिळाली आणि त्याने एक विकेट पण घेतली. 

सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच): 2014 
2014 मध्ये ऍरॉन फिंच सनरायझर्स हैदराबादसाठी खेळला होता. 13 सामन्यात त्याने 309 धावा केल्या होत्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या याच हंगामात आलेली. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध 88 धावांची खेळी केली होती. या सामन्याचा तो सामनावीरदेखील होता. 

हेही वाचा – Lowest Score In History Of IPL : सर्वात अनुभवी खेळाडूंचा संघ, पण Lowest Score चा रेकॉर्ड मोडण्यात अग्रेसर; IPL च्या इतिहासातील या संघांचा लाजिरवाणा पराभव, वाचा यादी

मुंबई इंडियन्स (एमआय): 2015
मुंबईसाठी फिंचने तीन सामने खेळले. या तीन सामन्यात त्याने 23 धावा केल्या. 10 नाबाद ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली. दुखापतीमुळे तो या हंगामाला मुकला. 

गुजरात लायन्स (जीएल): 2016-2017
एरॉन फिंच  गुजरात लायन्ससाठी दोन हंगामात मिळून 26 सामने खेळला होता. 23 सामन्यात फिंचने  692 धावा केल्या होत्या. 2016  च्या हंगामात 5 आणि 2017 च्या हंगामात 2 असे  मिळून फिंचने गुजरातसाठी 7 अर्धशतकं मारली. 2016 च्या हंगामात त्याने सलग तीन अर्धशतकेदेखील मारली होती. 

किंग्स इलेव्हन पंजाब (केएक्सआयपी): 2018
किंग्स इलेव्हन पंजाबसाठी फिंच एक हंगाम खेळाला. त्याने 2018 च्या हंगामात 10 सामन्यात 134 धावा केल्या. 46 धावा ही फिंचची सर्वोच्च धावसंख्या होती. 
या निराशाजनक कामगिरीनंतर पंजाबने फिंचला संघातून काढले.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी): 2020
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठीदेखील एरॉन फिंच खेळला आहे. 2020 च्या आयपीएलच्या हंगामात त्याने 12 सामने खेळले. या 12 सामन्यात त्याने268 धावा केल्या. यात एका अर्धशतकाचा समावेश होता. 

कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर): 2022
कोलकाता नाइट रायडर्स हा शेवटचा संघ होता ज्या संघासाठी फिंच खेळला. त्याने कोलकातासाठी पाच सामने खेळले. या पाच सामन्यात फिंचने 86 धावा केल्या. फिंचने एक अर्धशतकदेखील मारले होते. 2022 नंतर फिंचला कोणत्याच संघाने घेतले नाही. फिंच आयपीएलमध्ये 9 संघासाठी खेळला जे एक रेकॉर्ड आहे. या 9 संघांसाठी तो 92 सामने खेळला आणि 2091 धावा केल्या. नाबाद 88 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने 15 अर्धशतकेदेखील मारली होती. 
आयपीएलमध्ये फिंच याने एक विकेटदेखील घेतली होती. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number