Shubman Gill and Sara Tendulkar Marriage : अभिनेते, अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.. नव्हे; कधी कधी तर ती खोडच असते. क्रिकेटचा शहनशाह सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर आणि युवा क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्या नात्याबद्दल (Relationship) चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा रंगते. हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या जोरदार चर्चा आहेत आणि ते अनेकदा एकत्र स्पॉटही झाले आहेत. अशातच, आता शुभमन गिलचे वडील लखविंदर सिंह यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी शुभमन आणि साराच्या लग्नाच्या प्रश्नावर दिलेल्या प्रतिक्रियेची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
व्हायरल व्हिडिओतील नेमका संवाद
हा व्हायरल व्हिडिओ एका क्रिकेट सामन्यादरम्यानचा आहे. सामना पाहण्यासाठी शुभमन गिलचे वडील लखविंदर सिंह उपस्थित होते. त्यांच्या बाजूला भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घातलेला एक लहान मुलगा बसलेला दिसत आहे, तर शुभमनचे वडील पांढरे कपडे घालून सामना पाहात आहेत. याच वेळी, क्रिकेट पाहायला आलेल्या एका चाहत्याने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत शुभमनच्या लग्नाविषयी थेट प्रश्न विचारला.
व्हिडिओमध्ये समोरची व्यक्ती लखविंदर सिंह यांना थेट विचारताना दिसत आहे की, “अंकलजी, शुभमन गिलचे लग्न कधी लावून देणार?”
वडिलांची प्रतिक्रिया: या प्रश्नानंतर शुभमनच्या वडिलांनी केवळ हात वर केला आणि हसले. त्यांच्या हावभावातून ‘देवाच्या मनात जेव्हा येईल, तेव्हा लग्न होईल’ असा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा – IPL 2026 Retentions List: कोण रिटेन अन् कोणाला केलं रिलीज? सर्व 10 आयपीएल संघांची यादी जाहीर
सारा तेंडुलकरच्या नावावर मौन
पहिला प्रश्न विचारल्यानंतर लगेचच समोरच्या व्यक्तीने त्यांना दुसरा प्रश्न विचारला: “शुभमनचे लग्न सारा तेंडुलकरसोबत करणार का?”
प्रश्नाकडे दुर्लक्ष: चाहत्याच्या या थेट प्रश्नाकडे मात्र शुभमनच्या वडिलांनी दुर्लक्ष केले आणि त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच, त्यांना हा प्रश्न आवडला नसल्याचेही भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्यासारखे वाटते. केवळ 14 सेकंदांचा असलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Fans at Eden Garden are asking Lakhwinder uncle about when Shubman Gill will get married. ?? pic.twitter.com/7kGXMH4gwP — Ahmed Says (@AhmedGT_) November 14, 2025
नात्याबद्दल खरं काय ते अजूनही गुलदस्त्यात!
सारा आणि शुभमन यांच्या नात्याची चर्चा अनेक दिवसांपासून होत असली, तरी या दोघांनीही त्यांच्या नात्यावर कुठेही जाहीरपणे भाष्य केलेले नाही. ते दोघे अनेकदा रेस्टॉरंट्स आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. मात्र, हे दोघे खरंच लग्नबंधनात अडकणार का, हे तर भविष्यातच समजेल.