Cheteshwar Pujara Brother in Law: माजी भारतीय क्रिकेटपटूच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मेहुण्याने उचलल टोकाचं पाऊल; ‘हे’ कारण समोर

राजकोटमध्ये राहणाऱ्या जीतने आपल्या घरातच गळफास लावून जीवन संपवले. शेजाऱ्यांनी आवाज ऐकल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Cheteshwar Pujara Brother in Law: माजी भारतीय क्रिकेटपटूच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मेहुण्याने उचलल टोकाचं पाऊल; ‘हे’ कारण समोर

Cheteshwar Pujara Brother in Law: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारावर मोठा आघात झाला आहे. त्याचा मेहुणा जीत पाबारी (वय अंदाजे 30-35) याने आपलं आयुष्य संपवलं आहे. राजकोटमध्ये राहणाऱ्या जीतने आपल्या घरातच गळफास लावून जीवन संपवले. शेजाऱ्यांनी आवाज ऐकल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. 

हेही वाचा – Gautam Gambhir On Resignation Ind vs SA 2nd Test : टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने पराभवाची जबाबदरी स्वीकारली! "पण सुरुवात माझ्यापासून" राजीनाम्यावर बोलताना केलं 'गंभीर' वक्तव्य

वर्षभरापूर्वी दाखल झाला होता गंभीर गुन्हा

नोव्हेंबर 2024 मध्ये जीत पाबारी यांच्यावर त्याच्या होणाऱ्या बायकोने लैंगिक छळ, मारहाण आणि धमकावणे असे गंभीर आरोप केले होते. पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, जीतने लग्नाच्या आश्वासनावर अनेक वेळा लैंगिक संबंध ठेवले, नंतर कोणत्याही कारणाशिवाय साखरपुडा मोडला आणि दुसऱ्या महिलेशी लग्न केले. पुजाराच्या नावाने मुलीला वारंवार धमक्या देण्यात आल्याचाही आरोप आहे. या प्रकरणानंतर जीत पाबारी मानसिकदृष्ट्या प्रचंड त्रस्त झाला होता, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो नैराश्यात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

हेही वाचा –  IND vs SA: भारतासाठी सर्वात वाईट दिवस! 'या' 5 खेळाडूंनी कापलं टीम इंडियाचं नाक

पोलीस तपास सुरू

जीत पाबारी हा राजकोटमध्ये एकटा राहत होता. घटनेनंतर पोलिसांनी घराची तपासणी केली मात्र सुसाईड नोट मिळाली नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तथापी, या प्रकरणाचा आणखी तपास पोलीस करत आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number